China, Taiwan : विलीनीकरण करूच, पण शांततेच्या मार्गाने

तैवानबाबत चीनचा नरमाईचा सूर; अमेरिकेच्या इशाऱ्याचा परिणाम
Taiwn China
Taiwn ChinaAgrowon

बीजिंग (वृत्तसंस्था) : तैवान (Taiwn) हा भाग चीनच्या (China) अधिपत्याखाली येईलच; मात्र ही प्रक्रिया शांततेच्या मार्गाने करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे स्पष्ट करत चीन सरकारने तैवानबाबतचा (China Government) आपला सूर नरमाईचा केला आहे. चीनने तैवानवर आक्रमण केल्यास दुसऱ्या दिवशी अमेरिका आणि कॅनडाच्या युद्धनौका तैवानच्या किनाऱ्यावर उभ्या करू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने त्यांची भूमिका मवाळ केली आहे.

Taiwn China
#Shorts : अमेरिका-चीन युद्धामुळं अन्नधान्य टंचाई वाढेल ? | ॲग्रोवन

तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या महिनाभरापासून अत्यंत तणावाचे वातावरण आहे. याबाबत पत्रकारांनी चीन सरकारमधील तैवान विभागाचे प्रवक्ते मा शिआओग्वांग यांना विचारले असता, ‘सध्या स्वायत्त असलेल्या तैवानचे विलीनीकरण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ही प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने आणि पुरेशा गांभीर्याने होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू,’ असे त्यांनी सांगितले. प्रसंगी बळाचा वापर करूनही तैवानवर नियंत्रण मिळवू, अशी भाषा चीन सरकारने पूर्वी वापरली आहे. मात्र, अमेरिकेचा तैवानला वाढता पाठिंबा पाहता शिआओग्वांग यांनी आज तैवानबाबत बोलताना ‘बळाचा’ वापर टाळला.

Taiwn China
China US War : चीन-अमेरिकेची युध्दखोरी शेतकऱ्यांच्या मुळावर?

‘आम्ही तैवानला चीनमध्ये सामील होण्याचे फायदे समजावून सांगू, जनतेशी संवाद वाढवू. मातृभूमी एक होणे आवश्‍यक आहे आणि ती निश्‍चितच एक होईल, त्यात कोणीही अडथळा आणू शकत नाही. तैवानला चिथावणी देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही योग्य धडा शिकवू,’ असा इशाराही मा शिआओग्वांग यांनी दिला.

------------------------

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com