Landslide : दरडप्रवण गुटके गावातील १४ कुटुंबांचे स्थलांतर

पुणे : घाटक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संभाव्य दरड प्रवण क्षेत्रात समावेश असलेल्या मुळशी तालुक्यातील गुटके गावच्या १४ कुटुंबांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या निवासी पत्रा शेडच्या घरांमध्ये स्थलांतर केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या गावाला भेट देऊन कुटुंब आणि पशुधनाच्या स्थलांतराची पाहणी केली.
Landslide
LandslideAgrowon

पुणे : घाटक्षेत्रात पावसाचे प्रमाण (Rainfall) वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संभाव्य दरड प्रवण क्षेत्रात (Lindslide) समावेश असलेल्या मुळशी तालुक्यातील गुटके गावच्या १४ कुटुंबांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या निवासी पत्रा शेडच्या घरांमध्ये स्थलांतर केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी या गावाला भेट देऊन कुटुंब आणि पशुधनाच्या स्थलांतराची पाहणी केली. (Migration Of Families)

Landslide
Manipur Landslide : मणिपुरात दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू

गेल्या वर्षी पावसानंतर या ठिकाणच्या लोकवस्तीच्या वरीलबाजूच्या डोंगराच्या जमिनीला एक फुटाची भेग पडल्याचे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले होते. त्यानंतर भुवैज्ञानिकांनी तत्काळ या ठिकाणी भेट देऊन पाहणी व अभ्यास केला. अभ्यासाअंती मूळ ठिकाणाहून जमीन सरकल्याचे आढळून आले. तसेच, पावसादरम्यान या भेगेतून पावसाचे पाणी पाझरून जमिनीखाली कठीण खडकावरून आणि घरांच्या पायाखालून वाहत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लोकवस्तीसाठी धोकादायक असल्याने गेल्या वर्षी तेथील कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषदेने बांधलेल्या सभामंडपात स्थलांतरित केले होते.

फियाट इंडिया प्रा. लि.च्या सहकार्याने प्रत्येकी २ खोल्यांची १६ पत्र्यांच्या शेडची निवारा केंद्रे बनवण्यात आली असून त्यासाठी गावचे सरपंच श्रीराम वायकर यांनी जमीन दिली आहे. याव्यतिरिक्त पुणे जिल्हा परिषदेने या कुटुंबांच्या पशुधनासाठी गोठे बांधले आहेत. जिल्हा परिषदेने या लोकवस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी ८ लाख खर्चून पाणीपुरवठा योजना उभारली असून, सौरदिवे तसेच अन्य मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या आहेत. गॅस सिलिंडर, शेगडीही देण्यातआली असून कोविड क्वारंटाइन केंद्रांमधील खाटा, तसेच न वापरलेल्या नवीन गाद्याही या प्रत्येक कुटुंबांना देण्यात आल्या आहेत.

गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी या पुनर्वसनासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आणि सरपंच श्रीराम वायकर यांनी जमीन दिल्याबद्दल तसेच फियाट इंडियाचे राकेश बावेजा यांनी सामाजिक उत्तरदायित्व दाखवून या निवासी शेडच्या बांधकामाला निधी पुरविल्याबद्दल या कुटुंबांनी कृतज्ञता व्यक्त केली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com