Millet Processing : ‘एमटीडीसी’त मिळणार तृणधान्याचे खाद्य पदार्थ

पौष्टिक तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा आदीचा समावेश आहे. पौष्टिक तृणधान्यात लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडीन असे सूक्ष्म पोषक घटक असतात.
Millet Processing
Millet ProcessingAgrowon

कोल्हापूर ः संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ (Millet Year) म्हणून घोषित केले. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (Maharashtra Tourism Development Corporation) राज्यातील पर्यटन निवासी केंद्र (रिसॉर्ट) व निवास न्याहरी केंद्रात पौष्टिक तृणधान्याचे खाद्य पदार्थ (Millet Processed Food) उपलब्ध करून देणार आहे. यातून स्थानीक शेतकरी, महिला बचत गटांना रोजगार लाभण्यास मदत होणार आहे.

पौष्टिक तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा आदीचा समावेश आहे. पौष्टिक तृणधान्यात लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडीन असे सूक्ष्म पोषक घटक असतात.

ग्लुटेनमुक्त आहेत. तृणधान्याद्वारे डायरिया, बद्धकोष्ठता,‍ आंतड्याच्या आजारास प्रतिबंध होतो. त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदयविकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत करते.

तृणधान्य आधारित पदार्थांना कॅल्शियमवाढीसाठी आहारात स्थान दिले जाते. तृणधान्याच्या पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ उपक्रम राबवणार आहे.

महामंडळाच्या उपहारगृहामध्ये तृणधान्यापासून बनवलेल्या (ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरां) रुचकर पाककृती पर्यटकाना दिल्या जातील. इडली, डोसा, उत्तप्पा, खिचडी, बिस्किट, केक, मोदक, भाकरी, पापड, लाडू, उपमा आदी पदार्थांचाही समावेश असेल.

तृणधान्यापासून स्थानिक पाककृतीनुसार पदार्थ बनवले जातील. पर्यटक निवास व उपहारगृहाच्या दर्शनी भागात पदार्थांची उपलब्धता आहारमूल्याचा फलक व लोगो लावण्यात येणार आहे.

Millet Processing
Free Grain : गरिबांना आणखी वर्षभर मिळणार मोफत धान्य

याशिवाय स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने मंडळाच्या विविध उपहारगृहांत, लोणार, फर्दापूर, औरंगाबाद, वेरुळ, नाशिक, सोलापूर व इतर प्रादेशिक कार्यालयाच्या शक्य तेथे हुरडा पार्टी (ज्वारी) होणार आहेत.

स्थानिक बचत गट, शेतकरी यांच्यामार्फत नाचणीचे वाळलेले पापड, कुरडया, बिस्किट पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

शक्य असलेल्या ठिकाणी स्थानिक अल्प भू-धारक शेतकरी यांना महामंडळाच्या पर्यटक निवासात पौष्टिक तृणधान्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी स्टॉल उभा करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

आरोग्यदायी पर्यटन

जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागाशी समन्वयातून तृणधान्याबाबत जागृती कार्यक्रम घेणे, स्थानिक शेत ते थेट पर्यटक अशा संकल्पना राबविणे, कृषी महाविद्यालयांच्या मदतीने तृणधान्याची लागवड करणे.

स्थानिक शेतकऱ्यांशी समन्वय साधून महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांची फार्म टूर आयोजित करणे, अशा संकल्पना अंमलात आणून पर्यटकांना आरोग्यदायी पर्यटन घडवून आणावे अशा सूचना व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी व महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com