Agricultural Model : ‘लखपती शेती’चे मॉडेल ठरले शेतकऱ्यांचे आकर्षण

एका एकरातील विशिष्ट जागा विशिष्ट गोष्टींसाठी निश्चित करूनच हा प्रकल्प साकारला आहे.
Agricultural Model
Agricultural Model Agrowon

Kolhapur Agriculture News : अल्पभूधारकांसाठी (Marginal Farmer) आदर्श ठरणारे, शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणारे लखपती शेतीचे मॉडेल (Agricultural Model) कणेरी (ता. करवीर) येथील श्री सिद्धगिरी मठाच्या वतीने सुरू असणाऱ्या सुमंगल पंचमहाभूत सोहळ्यात आकर्षण ठरत आहे. एक एकरात दीडशेहून अधिक पिके कल्पकतेने घेण्यात आली आहेत.

शेतकऱ्याने हतबल न होता या नियोजनबद्ध शेतीची कास धरली तर त्याच्या कुटुंबाला अन्यत्र कोठेही कामाला जावे जाणार नाही किंवा त्याच्या शेतात बाहेरचा मजूर आणण्याची आवश्यकताही भासणार नाही.

स्वाभिमानी, स्वावलंबी कुटुंबासाठी स्वावलंबी लखपती शेती, असे या शेतीला नाव देण्यात आले आहे. वर्षभरात चार जणांच्या कुटुंबाला एक एकरातून घरचा खर्च जाऊन एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न राहू शकते, असे सांगण्यात येत आहे.

Agricultural Model
Indian Economy: भारतीय अर्थव्यवस्थेचे मॉडेल चिंता वाढवणारे

एका एकरातील विशिष्ट जागा विशिष्ट गोष्टींसाठी निश्चित करूनच हा प्रकल्प साकारला आहे. एक एकर क्षेत्रात घर, गोठा, शौचालय, गोबरगॅस, परसबाग, शेळी, मेंढी, कोंबडी पालन, ऊस, सोयाबीन, स्टीव्हिया, झेंडू, अ‍ॅस्टर, गलाटा यांसारखी नगदी पिके, चाऱ्यासाठी विविध पिके, भाजीपाला, कंदवर्गीय, फळवर्गीय, पर्णवर्गीय, वेलवर्गीय पिके घेण्यात आली आहेत.

फुले आणि भाज्या विकून या कुटुंबाला दिवसाला किमान चारशे ते पाचशे रुपये मिळतील, अशी व्यवस्था या प्रकल्पात आहे. सर्व प्रकारच्या धान्यांपासून ते सर्व प्रकारच्या पालेभाज्या, डाळी, विविध प्रकारचे भोपळे असे वेलवर्गीय आणि कंदवर्गीय पिकांचाही येथे समावेश आहे.

Agricultural Model
Sericulture Management : शेतकरी नियोजन - रेशीम शेती

बीटापासून ते पूजेसाठी लागणाऱ्या विविध फुलांचीही येथे लागवड केली आहे. शेतकऱ्याला दैनंदिन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची यादी करून त्याप्रमाणे सर्व वस्तू या शेतात पिकवल्या जात आहेत.

मठाधीपती श्री काडसिद्धेश्वर स्वामी, व्यवस्थापक तानाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com