Weather Update : किमान तापमानात वाढ; गारठा कायम

राज्यात थंडी कायम राहणार असली तरी किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे (Cold Wind) राज्यात गुलाबी थंडीचे (Winter Arrival) आगमन झाले आहे. खानदेशासह राज्यात गारठा (Cold Weather) कायम असून, किमान तापमानात (Minimum Temperature) काहीशी वाढ झाली आहे. राज्यात थंडी कायम राहणार असली तरी किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Weather Update : उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतच असून, राजस्थानमधील चूरू येथे मंगळवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Weather Update
Weather Update : राज्यात गुलाबी थंडीचे आगमन

धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, नाशिक, औरंगाबाद, येथे किमान तापमानाचा पारा १० अंशांपेक्षा खाली होता. उर्वरित राज्यात किमान तापमान काहीसे वाढले असले तरी गारठा कायम होता. आज (ता. २३) राज्यात थंड व कोरड्या हवामानासह किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

कमी दाब क्षेत्र निवळतेय

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता ओसरली होती. ही ठळक कमी दाब प्रणाली आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत होती. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली आज (ता. २३) आणखी निवळून जाण्याचे संकेत आहेत. उद्यापर्यंत (ता. २४) अंदमान समुद्रात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८.९ (११.२), जळगाव २९.३ (९.२), धुळे २८ (८.२), कोल्हापूर २९ (१२.२), महाबळेश्वर २५.६(१२.१), नाशिक २७.५ (९.५), निफाड २७.१ (७.४), सांगली २९.५(१८.१), सातारा २८.८(१५.५), सोलापूर ३२.२ (१८.८), सांताक्रूझ ३१.७(१७), डहाणू ३१.४ (१६.५), रत्नागिरी ३२.५ (१९.१), औरंगाबाद २९.५ (१०), नांदेड ३०.२ (१६), परभणी २९.४ (१४.२), अकोला ३०.१ (१३.१), अमरावती २९ (११.७), बुलडाणा २७.३ (१२.५), ब्रह्मपुरी ३०.२ (१४.१), चंद्रपूर २७.८ (१४.८), गडचिरोली ३० (१३), गोंदिया २७.६(११.२), नागपूर २८ (१३), वर्धा २८(१३), वाशीम २९.८ (१३), यवतमाळ २९.५ (१०.५).

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

निफाड ७.४, धुळे ८.२, जळगाव ९.२, नाशिक ९.५, औरंगाबाद १०.०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com