Indian Agriculture : परराज्यांतील खासदारांची नंदुरबारमधील शेतकऱ्यांशी चर्चा

आंतरराष्ट्रीय पोषक तृणधान्य या पार्श्‍वभूमीवर जैवविविधता, प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रदर्शन या वेळी मांडण्यात आले.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

नंदुरबार : संसदीय विकास परियोजनेंतर्गत राजस्थान (Rajasthan), गुजरात (Gujarat) आणि मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खासदारांनी (MP) जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

संसदीय संकुल विकास परियोजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी संसदीय संकुल विकासाचे प्रयोग राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

या वेळी व्ही. सतीश, पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, प्रभू वसावा, रामसिंग राठवा, खासदार डॉ. हीना गावित, मध्य प्रदेशचे डॉ. सुमेरसिंग सोलंकी, गजेंद्रसिंग पटेल, दुर्गादास उईके, राजस्थानचे जसकौर मीना आणि गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आदी उपस्थित होते.

नवापूर तालुक्यातील खांडबारा व नंदुरबार तालुक्यांतील डॉ. हेडगेवार सेवा समितीच्या केव्हीकेत ग्राम विकासातील प्रयोगाची पाहणी, शेतकरी संवाद यात्रा झाली.

जिल्ह्यात स्थलांतर थांबविणे, उपलब्ध संसाधन आधारित उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

खांडबारा व वडसत्रा येथे जैविक उत्पादन, विहीर खोलीकरण, एकात्मिक शेती, शेतकरी उत्पादक कंपनींतर्गत राइस मिल, पशुखाद्यनिर्मिती प्रकल्पांना भेटी दिल्या.

Indian Agriculture
Sheatkari Samvad : सांगवी जोमदेव शेत शिवारात रंगला शेतकरी संवाद

प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रदर्शन

आंतरराष्ट्रीय पोषक तृणधान्य या पार्श्‍वभूमीवर जैवविविधता, प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रदर्शन या वेळी मांडण्यात आले.

यात सातपुड्यातील मेराली जैवविविधता संकलन संवर्धन व प्रशिक्षण केंद्र, कंजाला, मोलगी परिसर सेवा समिती, माविमअंतर्गत लोक संचलित साधन केंद्र सहयोगिनी, स्वयंसेवी संस्था, शेतकरी उत्पादकांनी सहभाग घेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com