
घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सलाम किसान समुहाच्या (Salam Kisan Group) मुंबई येथील कार्यालयाला १५ मार्च रोजी सदिच्छा भेट दिली.
त्यांनी `सलाम किसान`च्या कार्याचे कौतुक केले. शेतकऱ्यांसाठी होत असलेल्या डिजिटल क्रांतीमध्ये (Digital Revolution) सलाम किसान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सलाम किसान समुहाचे प्रमुख मार्गदर्शक योगेश मानधनी यांनी आ. टोपे यांचे स्वागत केले. मानधनी यांनी सलाम किसान`कडून पुरविल्या जाणाऱ्या सेवा व उत्पादनांची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांविषयी आ. टोपे यांना अवगत केले.
यावेळी कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेले बाळासाहेब दराडे, सनदी लेखापाल आनंद परतानी, श्याम मुदंडा आदी उपस्थित होते.
`सलाम किसान`च्या माध्यमातून आगामी काळात विविध सेवांची आणि रोजगारनिर्मितीची व्याप्ती वाढवणार असल्याचे यावेळी योगेश मानधनी यांनी सांगितले.
धनश्री मानधनी व प्रद्युम्न मानधनी यांनी सुरू केलेल्या सलाम किसान समूहाकडून विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा गेल्या काही महिन्यांत अनेक शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. सलाम किसान हे सुपरअॅप असून शेती मूल्यसाखळीतील सर्व घटकांना एन्ड टू एन्ड सोल्युशन पुरविण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
सलाम किसान ॲप ला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांसोबत अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनाही सलाम किसानच्या संकल्पनेविषयी माहिती देत आहेत.
तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तोडगा कसा काढता येईल आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घेता येईल, याबद्दल ते या दौऱ्यांमध्ये मार्गदर्शन करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.