Election : मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार निवडणूक रिंगणात

जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची सोमवारी (ता. १४) छाननी करण्यात आली.
District Milk Union Election
District Milk Union Election Agrowon


जळगाव : जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या (District Milk Union) निवडणुकीसाठी (Election) उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची सोमवारी (ता. १४) छाननी करण्यात आली. मुक्ताईनगरातून आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीवरील हरकत फेटाळण्यात आली. त्यामुळे मंदाकिनी खडसे विरुद्ध मंगेश चव्हाण यांच्यात लढत होईल. १३ जणांचे अर्ज बाद करण्यात आले, तर रावेर तालुक्यातून जगदीश बढे याचा एकमेव अर्ज आहे. पारोळ्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील व राष्ट्रवादीचेे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यात लढत होणार आहे.

तसेच ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, भुसावळचे आमदार संजय सावकारे, किशोर पाटील आदींचे अर्जही वैध ठरले. आजी माजी मंत्री, आजी माजी आमदार या निवडणुकीत दिसतील, असे चित्र तयार झाले आहे. जळगाव जिल्हा दूध संघासाठी एकूण ३८२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यात १८ जणांच्या अर्जावर हरकती आल्या होत्या. त्या अर्जांची सोमवारी (ता. १४) जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांच्यासमोर सुनावणी झाली.

District Milk Union Election
Milk Dairy : जिल्हा दूध संघाच्या दूध संकलनात वाढ

आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी हरकत घेतली होती. संजय पवार यांच्या अर्जावर घेण्यात आलेली हरकतही फेटाळण्यात आली. छाननीत १३ उमेदवारांचे अर्ज त्रुटींमुळे बाद करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com