
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) हाच खरा पक्ष आहे. काही आमदार आणि खासदार पक्षातून बाहेर पडले तर ते पक्षाचे नेतृत्व करू शकत नाहीत.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये. शिवाय पक्षांतर्गत निवडणुकांची परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी (ता.२०) पुन्हा सिब्बल (Kapil Sibbal) युक्तिवाद करतील.
पक्षांतर्गत वादावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मंगळवारी (ता. १७) दुपारी सुनावणी झाली.
शिंदे गटाने मागील सुनावणीवेळी मांडलेले सर्व मुद्दे खोडून काढत जे आमदार आणि खासदार पक्षातून बाहेर पडले त्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.
त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे अपात्रतेबाबतचा निर्णय आल्याशिवाय निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नेतृत्वाबाबत निर्णय देणे घाईचे होईल.
मुळात पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरेच करत असून शिंदे गटाने जी कागदपत्रे सादर केली आहेत, त्यात अनेक त्रुटी आहेत.
शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार आणि खासदार हे उद्धव ठाकरे यांची सही असलेल्या एबी फॉर्मवर निवडून आले आहेत.
त्यामुळे ते पक्षावर दावा सांगू शकत नाहीत. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खरी असतील तर ओळखपरेड करा.
शिंदे गट आज पक्षाच्या घटनेवर आक्षेप घेत आहेत, हे अनाकलनीय आहे. ते पक्षात असताना त्यांनी त्यावर आक्षेप घेतला नाही.
एबी फॉर्म, पक्षांच्या चिन्हावर निवडणूक आणि अन्य कायदेशीर बाबी हे लोकप्रतिनिधी मान्य करत आले तर आता आक्षेप घेणे नियमबाह्य आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी आयोगासमोर केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.