ZP School : कोसंबी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा आमदारांनी घेतला वर्ग

कोसंबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या गैरहजेरीवरून संताप व्यक्त करून बंड पुकारत मोर्चा काढला.
Vijay Wadettivar
Vijay WadettivarAgrowon

ZP School News चंद्रपूर : कोसंबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (ZP Primary School) विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या गैरहजेरीवरून संताप व्यक्त करून बंड पुकारत मोर्चा काढला.

याची गंभीर दखल घेत आमदार विजय वडेट्टीवार (Vijay wadettivar) यांनी शुक्रवारी (ता.३) शाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत शिक्षकांना धारेवर धरले.

तसेच, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासत चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथे इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण देणारी जिल्हा परिषद शाळा असून येथे ५ शिक्षक कार्यरत आहे. मात्र येथील कार्यरत शिक्षक हे मुख्यालयी राहात नसून ब्रह्मपुरी वरून ये-जा करतात.

Vijay Wadettivar
School Mobile : शालेय वेळेत विद्यार्थ्यांना मोबाइल वापरास बंदी

यामुळे शिक्षक वेळेवर शाळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत असून अनेक विषयांचे तास होत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सदोष कार्यप्रणालीवर ठपका ठेवत गावातून प्रभात फेरी काढून आगळे-वेगळे आंदोलन केले.

Vijay Wadettivar
ZP School : जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट

सदर आंदोलनाची गंभीर दखल राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ दखल घेत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसंबी (खड) येथे ब्रह्मपुरी गटविकास अधिकारी पुरी यांना सोबत घेत अकस्मात भेट दिली.

यानंतर प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत गुणवत्ता दर्जाही तपासला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com