Raj Thakare
Raj ThakareAgrowon

Raj Tackeray : कुडाळ, रत्नागिरीमध्ये जानेवारीत मनसेची सभा

मनसेसाठी जनतेच्या मनात सकारात्मक सिग्नल चेहऱ्यावर दिसत आहेत. त्यामुळे येत्या जानेवारी महिन्यात कुडाळ येथे आणि दुसरी सभा चिपळूण किंवा रत्नागिरीमध्ये घेणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद सांगितले.

रत्नागिरी ः मनसेसाठी जनतेच्या मनात सकारात्मक सिग्नल चेहऱ्यावर दिसत आहेत. त्यामुळे येत्या जानेवारी महिन्यात कुडाळ येथे आणि दुसरी सभा चिपळूण किंवा रत्नागिरीमध्ये घेणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पत्रकार परिषद सांगितले.

Raj Thakare
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

रत्नागिरीतील मनसेच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनासाठी आलेल्या ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सरकारकडून आपलं अपयश झाकण्यासाठी किंवा एखादा विषयावरील लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी वेगवेगळी वक्तव्य करून वाद घडवून केले जातात. याचा जनतेने विचार केला पाहिजे. कोकणी जनता राग व्यक्त करत नाही.

सध्या आमदार या पक्षात की त्या पक्षात हे जनता खपवून घेत आहे. रिफायनरीसारख्या प्रकल्पांना कोकणात थारा नाही, पण महाराष्ट्रातून प्रकल्प दूर जाणेही परवडणारे नाही. गेल्या काही महिन्यात दोन प्रकल्प महाराष्ट्रातून दूर गेलेत; परंतु रिफायनरीसारखे प्रकल्प येण्याला कारण येथील लोकांनी परप्रांतियांना विकलेल्या जमीनी हेच आहे. हजारो एकर जमीन एकत्रितपणे खरेदी केली जात होती, तेव्हा कुणालाही संशय आला नाही. त्यावेळी खबरदारी घ्यायला हवी होती. काही गोष्टींबद्दल जागृत राहणे आवश्यक आहे.

मध्यावधी निवडणुकीविषयी ते म्हणाले, मागील अडीच वर्षात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका तुंबलेल्या आहेत. या निवडणुका सत्ताधारी जाणूनबुजून पुढे ढकलत आहेत.

टोल घेऊ देणार नाही

मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अजूनही सुरु झालेले नाही. तरीही टोल घेण्याबाबत पावले उचलली जात आहेत. यावर राज ठाकरे म्हणाले, टोल बंद करण्यासंदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. मी सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर आलोय म्हणून टोल घेण्यास आरंभ झालेला नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com