
विविध प्रकारचे आधुनिक नांगर, तव्याचे नांगर, कल्टिव्हेटर, (Cultivator) डिस्क हॅरो (Disk Harrow), रोटरी टिलर (Rotary tiller) वापरता येतात. पल्टी नांगरामध्ये मेकॅनिकल पल्टी, हायड्रोलिक पल्टी, ऑटोमॅटिक पल्टी असे प्रकार आहेत. याशिवाय स्पेड नांगर, तव्यांचा नांगर, हायड्रॉलिक पल्टी तव्यांचा नांगर, कल्टिव्हेटर, डिस्क हॅरो, रोटरी टिलर (रोटाव्हेटर), पॉवर हॅरो असे विविध नांगर बाजारात उपलब्ध आहेत. शेती कामांसाठी योग्य अवजारांचा वापर केल्यास उत्पादन खर्चात ३० ते ४० टक्के पर्यंत बचत शक्य आहे.
ट्रॅक्टरचलित मेकॅनिकल पल्टी नांगर
४० व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.
जमिनीची नांगरणी योग्य त्या खोलीपर्यत करता येते.
हलक्या, मध्यम, भारी जमिनीत उपयुक्त.
ट्रॅक्टरचलित हायड्रोलिक पल्टी नांगर
४० व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते. जमिनीची नांगरणी योग्य त्या खोलीपर्यत करता येते.
हलक्या, मध्यम, भारी जमिनीत उपयुक्त.
ट्रॅक्टरचलित फुले ऑटोमॅटिक पल्टी नांगर
४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.
ट्रॅक्टरच्या पोजिशियन कंन्ट्रोल लिव्हरद्वारे ऑटोमॅटिक पलटी करता येतो.
या नांगरामध्ये पल्टी करण्याकरीता मेकॅनिकल लिव्हर तसेच हायड्रोलिक सिलिंडरची आवश्यकता नाही.
या नांगरांची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता ८०.४५ टक्के इतकी आहे.
या नांगरासाठी हायड्रोलिक नांगरापेक्षा देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी येतो.
या नांगराची मुळ किंमत हायड्रोलिक नांगराच्या किमतीपेक्षा जवळपास २० टक्क्यांनी कमी आहे.
या नांगराने जमिनीची नांगरणी योग्य त्या खोलीपर्यत करता येते. तसेच हलक्या मध्यम व भारी जमिनीकरिता हा नांगर उपयुक्त आहे.
ट्रॅक्टरचलित कल्टिव्हेटर
३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.
नांगरणीनंतर ढेकळे फोडण्यासाठी उपयुक्त. हलक्या, मध्यम व भारी जमिनीसाठी उपयुक्त
ट्रॅक्टचलित स्पेड नांगर
४० व त्यापेक्षा जास्त ट्रॅक्टरने चालवता येते.
ट्रॅक्टरच्या पीटीओच्या साह्याने चालविला जातो. यामध्ये फणे असून ती इंजिनच्या क्रॅन्कशॉफ्ट सारखी कार्य करतात. जमिनीची नांगरणी योग्य त्या खोलीपर्यत करता येते.
हलक्या, मध्यम, भारी जमिनीत उपयुक्त.
बैलचलित टोकण यंत्र
हे यंत्र एक बैलजोडीच्या साह्याने चालणारे आहे.
या यंत्राची कार्यक्षमता २.३३ हेक्टर प्रति दिवस इतकी
आहे.
ट्रॅक्टरचलित टोकण यंत्र
४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.
या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहु, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते.
ट्रॅक्टरचलित न्यूमॅटिक टोकण यंत्र
४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.
हवेच्या दाबावर कार्य करत असल्यामुळे बियाण्यांची बचत होते.
या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहु, तूर इ. पिकांची पेरणी करता येते.
एका दिवसात साडेतीन ते चार हेक्टर क्षेत्रावर टोकण करता येते.
पेरणीच्या अचूकतेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
पेरणीची खोली एक समान असल्यामुळे चांगले उत्पादन येते.
पेरणीच्या प्रक्रियेदरम्यान कोणतेही नुकसान होत नाही.
ट्रॅक्टरचलित हायड्रॉलिक पल्टी तव्यांचा नांगर
४५ व त्यापेक्षा जास्त ट्रॅक्टरने चालवता येते.
मुरमाड व दगड गोट्याच्या जमिनीसाठी उपयुक्त.
जमिनीतील मातीची फेरपालट प्रभावीरीत्या करता येते.
- डॉ. तुळशीदास बास्टेवाड, ०२४२६-२४३२१९
(प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.