Prakash Ambedkar : मोदी गुजरात या स्वतंत्र राष्ट्राचे पंतप्रधान !

अॅड. प्रकाश आंबेडकर : भारत जोडो यात्रा म्हणजे ब्लँक मार्च
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarAgrowon

चंद्रपूर : देशाच्या आजपर्यंतच्या पंतप्रधानांनी इंटरनॅशनल (PM Narendra Modi) कार्यक्रम देशातील विविध ठिकाणी पार पाडले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच कार्यक्रम केवळ गुजरातमध्येच (Gujarat) पार पाडले आहेत. महाराष्ट्रातील प्रस्तावित उद्योग पळविण्यासोबतच खनिज, पाणीसुद्धा गुजरातला पळविले जात आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची कृती केवळ गुजरात या स्वतंत्र राष्ट्राचे पंतप्रधान असल्याची दिसत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

चंद्रपूर येथे वंचितच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी जिल्हा दौऱ्यावर असलेले अॅड. आंबेडकर विश्रामृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी माजी राज्यमंत्री रमेश गजबे, जिल्हाध्यक्ष भूषण फुसे उपस्थित होते.

Prakash Ambedkar
PM Kisan : पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्राचे मिरज येथे उद्‍घाटन

रेल्वे विभागाने जपानकडून १ टक्का व्याजाने एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव दिला. यातून नवीन प्रकल्प, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्टर वाढविणे, नवीन रेल्वे लाइन टाकणे असा रेल्वे आणि रेल्वे बोर्डाचा उद्देश होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद-मुंबई या एकमेव मार्गावर खर्च केला आहे.

देशातील बिमारू राज्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी आधी प्रयत्न होत होते. शासनाच्या इंटस्ट्री, खासगी इंटस्ट्री पाठवून तेथील दारिद्र्य संपविले जात होते. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या सध्याच्या भूमिकेमुळे दक्षिणेतील राज्य चिंताग्रस्त दिसत आहेत. मागील काही वर्षांत देशातील मोठ्या कंपन्या देश सोडून जात आहेत. नवीन उद्योगासाठी नागपूर हे सर्वांत योग्य ठिकाण आहे.

परंतु तेथे नवीन उद्योग जाऊ नये म्हणून प्रयत्न होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील तरुणांना फसविले. मिहानमुळे दोन लाख नोकऱ्या आणि त्यावर आधारित तीन पट नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. परंतु या उद्योगात नोकरीचा फायदा विदर्भाला झालेला दिसत नाही, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.

पंचायत समिती निवडणुकीत पैसेवाटप

पूर्व विदर्भातील खनिज बाहेर जात आहे. राज्यातील सध्याचे सरकार बेकायदेशीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समोर करून भाजप आपले निर्णय राबवीत आहे. आधीच दोन मोठे प्रोजेक्ट पळविल्यानंतर आता पुन्हा पेट्रोलियम प्रोजेक्टसुद्धा पळविण्याचा विचार सुरू आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार अडचणीत येणार आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटण्यात आले. याची चौकशी करण्याची मागणी ईडी, इन्कम टॅक्स यांच्याकडे करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com