मॉन्सूनने जवळपास महाराष्ट्र व्यापला

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मॉन्सूनने पुढील प्रवासात गती घेतली आहे. मॉन्सूनने गुरूवारी (ता.१६) विदर्भाच्या बहुतांश भागात प्रगती करत जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.
मॉन्सूनने जवळपास महाराष्ट्र व्यापला
Monsoon UpdateAgrowon

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मॉन्सूनने (Monsoon Progress) पुढील प्रवासात गती घेतली आहे. मॉन्सूनने गुरूवारी (ता.१६) विदर्भाच्या बहुतांश भागात प्रगती करत जवळपास संपूर्ण महाराष्ट्र (Monsoon Covered Maharashtra) व्यापला आहे. मॉन्सूने विदर्भातील गोंदिया पर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने (Indian Meteorological Department) जाहीर केले आहे.

केरळात वेळेआधी पोचून ३१ मे पर्यंत गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी मॉन्सूनने कोकणात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (११ जून) बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला. १३ जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठत निम्म्या महाराष्ट्र व्यापला. बुधवारी (ता. १५) दक्षिण मराठवाड्यात प्रगती झाली. तर गुरूवारी (ता. १६) मोठी मजल मारून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापत गोंदिया पर्यंत धाव घेत विदर्भाच्या बहुतांश भागात मॉन्सून पोचला आहे.

मॉन्सूनने उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशाच्या काही भाग, संपूर्ण तेलंगणासह आंध्र प्रदेशचा बहुतांशी भागात प्रगती केली आहे. रविवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून संपूर्ण विदर्भ, आंध्र प्रदेशसह बंगालचा उपसागर व्यापून छत्तीसगड, ओडिशाच्या आणखी काही भागासह झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार, उत्तर प्रदेशमध्ये दाखल होण्यास पोषक हवामान आहे. तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातही मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, गोंदीयाचा काही भाग वगळता माॅन्सून राज्य व्यापल्याचे हवामान विभागाने जाहिर केले. मात्र राज्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. जोरदार पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या. पेरणीची तयारी करून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पूर्ण मोसमी पावसाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com