म्यानमारमध्ये माॅन्सून पाच-दहा दिवस लवकर धडकणार?

दक्षिण अंदमान समुद्रात (South Andaman Sea ) ६ मेच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Field) तयार होईल. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाईल. यामुळे म्यानमारमध्ये (Myanmar Monsoon) यंदाचा माॅन्सून ८ ते १३ मेच्या दरम्यान पोचण्याचा अंदाज आहे. एरवी म्यानमारमध्ये माॅन्सून दाखल होण्यास १८ मे उजाडतो. मात्र यंदा म्यानमारच्या दक्षिण भागात लवकरच माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज म्यानमारच्या हवामान विभागाने जाहीर केला आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

उष्णतेच्या लाटेने (Heat Wave) हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक खूषखबर (Good News For Farmer) आहे. म्यानमारमध्ये यंदा मॉन्सून नेहमीपेक्षा (Monsoon arrival) पाच-दहा दिवस लवकर धडक मारण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणाल म्यानमारमध्ये पाऊस पडला तर त्यात आमचा काय फायदा? तिथले पावसाचे थेंब आम्हाला थोडंच भिजवणार आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण म्यानमारमध्ये मॉन्सून लवकर दाखल झाला तर त्याचा परिणाम भारतावरही होणारच की, हे कसं विसरलात तुम्ही? त्याचं कारण म्हणजे दक्षिण अंदमानचा समुद्र.

दक्षिण अंदमानच्या समुद्रात ६ मेच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत जाईल. त्याचा परिणाम म्हणून म्यानमारमध्ये यंदाचा माॅन्सून ८ ते १३ मेच्या दरम्यान पोचण्याचा अंदाज आहे. एरवी म्यानमारमध्ये माॅन्सून दाखल व्हायला १८ मे उजाडतो. मात्र यंदा म्यानमारच्या दक्षिण भागात लवकर माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज म्यानमारच्या हवामान विभागाने जाहीर केला आहे.

मॉन्सून लवकर येणार की उशीरा यातली खरी ग्यानबाची मेख म्हणजे कमी दाबाचा पट्टा. हा पट्टा तयार झाला तर मॉन्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होईल. म्यानमारच्या हवामान विभागानं काय सांगितलं ते आपण बघितलं. पण याबाबतीत भारतीय हवामानशास्त्र विभागाचं म्हणजे आयएमडीचं म्हणणं काय आहे? तर दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो, असं आयएमडीनंही म्हटलं आहे. तसेच अंदमान आणि निकोबार बेंटांवर सर्वत्र गुरुवारी जोरदार पाऊस होईल, तर शुक्रवारी काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल, असा अंदाजही आयएमडीने दिला आहे. तर बुधवारी आणि गुरुवारी दक्षिण अंदमान समुद्र, उत्तर अंदमान समुद्र आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात जोराचे वारे वाहण्याची शक्यताही आयएमडीने वर्तवली आहे. शुक्रवापर्यंत या भागात ५० ते ६० किलोमिटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. वाऱ्यांचा वेग ७० किलोमिटरपर्यंत सुद्धा जाऊ शकतो, असेही आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

म्यानमार बंगाल उपसागराच्या किनाऱ्यालगत वसलेला आहे. येथे मालदीवनंतर माॅन्सून दाखल दाखल होतो. पंरतु मालदीवमधून अद्यापही माॅन्सूच्या संदर्भात अधिकृत माहिती हाती आलेली नाही. साऊथ एशियन क्लायमेट आऊटलूक फोरम अर्थात सॅस्काॅफने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर या माॅन्सूनच्या काळात भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात चांगला पाऊस होईल, असे सॅस्काॅफने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com