पुण्यासह कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल

मॉन्सूनची आगेकुच. मुंबई, पालघर, पुण्यापर्यंत मारली मजल
पुण्यासह कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल
Monsoon Update Agrowon

पुणे : गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत पोचल्यानंतर महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी तब्बल दहा दिवस वाट पाहायला लावणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) (Monsoon) आता वेग धरला आहे. शनिवारी (ता.११) मुंबई, डहाणू, पुण्यासह बहुतांश कोकण किनारपट्टी व दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल (Monsoon Arrival) झाल्याने हवामान विभागाने जाहीर केले. (Monsoon Arrived In Maharashtra)

देवभूमी केरळमध्ये नियमित वेळेच्या तीन दिवस आधीच (२९ मे ) पोचून, त्यानंतर दोनच दिवसांत संपूर्ण केरळ राज्य, कर्नाटक किनारपट्टीसह गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मॉन्सूनची प्रगती झाली. त्यानंतर प्रवाह मंदावल्याने मॉन्सून रेंगाळला होता. शुक्रवारी (ता. १०) महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावरील वेंगुर्ल्यापर्यंत मॉन्सून दाखल झाला होता. शनिवारी (ता. ११) मुंबई, ठाणे, डहाणू, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या काही भागासह कर्नाटकच्या गदगपर्यंतच्या भागात मॉन्सूनने चाल केली आहे.

वाटचालीस पोषक हवामान असल्याने सोमवारपर्यंत (ता. १३) मॉन्सून संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांशी भाग, संपूर्ण कर्नाटक, तामिळनाडूसह तेलंगणा, आंध्रप्रदेशच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तर बुधवारपर्यंत (ता. १४) मराठवाड्याच्या काही भागासह, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराचा बहुतांशी भाग, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com