माॅन्सूनची आज प्रगती नाही

महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनने जवळपास निम्मा महाराष्ट्र व्यापला. नंदूरबार, जळगाव, परभणीपर्यंतच्या भागांत मजल मारली होती. मात्र आज माॅन्सूनची प्रगती झाली नाही.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

पुणेः महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्यानंतर मॉन्सूनने (Monsoon) जवळपास निम्मा महाराष्ट्र व्यापला. नंदूरबार, जळगाव, परभणीपर्यंतच्या भागांत मजल मारली होती. मात्र आज माॅन्सूनची प्रगती झाली नाही. पुढील दोन ते तीन दिवासांत मॉन्सून वेगानं प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तविला.

गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत पोचल्यानंतर महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी तब्बल दहा दिवस वाट पहायला लावली. त्यामुळं चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. १० जून रोजी कोकणात प्रवेश करणारा मॉन्सूनने १२ जून रोजी संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंतचा टप्पा गाठलाय. निम्म्या महाराष्ट्रासह, दक्षिण गुजरात, कर्नाटकचा बहुतांश भाग, तेलंगाणा, रायलसीमाचा काही भाग आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागांतही मॉन्सूनने चाल केली. मात्र आज माॅन्सूनने याच भागांत मुक्काम केला. माॅन्सूनची प्रगती झाली नाही.

माॅन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामानये. त्यामुळं पुढील दोन ते तीन दिवसांत माॅन्सून अरबी समुद्र, गुजरात आणि मध्य प्रदेशचा काही भाग, तर संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात दाखल होईल. तर तमिळनाडूचा काही भाग, विदर्भाचा काही भाग तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडच्या काही भागांत दाखल होईल, असे संकेत हवामान विभागानं दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com