माॅन्सूनची आज या भागांत प्रगती

केरळात वेळेआधी पोचून ३१ मे पर्यंत गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी मॉन्सूनने कोकणात प्रवेश केला.
माॅन्सूनची आज या भागांत प्रगती
Monsoon UpdateAgrowon

पुणे ः नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने (Monsoon) गोंदीयाचा काही भाग वगळता राज्य व्यापले. मात्र पावसाचा प्रतिक्षा अद्याप कायम आहे. शुक्रवारी (ता.१८) ही राज्याच्या उर्वरित भागांत माॅन्सूनची प्रगती (Monsoon Progress) झाली नव्हती. भाग पुढील दोन ते तीन दिवसांत माॅन्सून व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने (Indian Meteorological Department) जाहिर केला.

दक्षिणेतील राज्यासह जवळपास संपूर्ण महाराष्ट्र माॅन्सूनने व्यापला. मात्र पावसाने (Rain) दडी दिली. परिणामी खरिपाच्या पेरण्या (Sowing) खोळंबल्या. केरळात वेळेआधी पोचून ३१ मे पर्यंत गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी मॉन्सूनने कोकणात प्रवेश केला. तर मजल दरमजल प्रवास करत माॅन्सूनने गुरूवारी (ता. १६) गोंदीयाचा काही भाग वगळता राज्य व्यापले. तर उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशाच्या काही भाग, संपूर्ण तेलंगणासह आंध्र प्रदेशचा बहुतांशी भागात माॅन्सून पोचला. त्यानंतर मात्र गुरुवारी आणि शुक्रवारी माॅन्सूनने बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यातच प्रगती केली. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये माॅन्सूनचा मुक्काम कायम आहे. माॅन्सूनची दिशा पोरबंदर, भावनगर, खंडवा, गोंदीया, दुर्ग, भवानीपटना, हलदा या भागापर्यंत आहे.

माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेशचा काही भाग, आंध्र प्रदेशसह नैऋत्य बंगालचा उपसागर व्यापून छत्तीसगड, ओडिशाच्या आणखी काही भागासह झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांत प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने जाहिर केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com