Monsoon Rain: राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज

उद्या सकाळपर्यंत हवामान विभगानं (Indian Metrological Department) राज्यातील काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा (Rain With Thunderstorm) अंदाज व्यक्त केलाय.
Rain In Maharashtra
Rain In MaharashtraAgrowon

राज्यात पावसाचा जोर (Rain In Maharashtra) कमी झालाय. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. मात्र इतर भागांमध्ये पावसाची उघडीप कायम होती. तर उद्या सकाळपर्यंत हवामान विभगानं (Indian Metrological Department) राज्यातील काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा (Rain With Thunderstorm) अंदाज व्यक्त केलाय.

आज कोकणात पावसाचं प्रमाण कमी झालं होतं. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाची उघडीप होती. तर पालघर जिल्ह्यातील डाहाणू, मोखेडा, मानगाव, तलासरी या मंडळांमध्ये हलक्या  सरी पडल्या.

मध्य महाराष्ट्रातील केवळ नाशिक जिल्ह्यात गुरुवारी पाऊस झाला. कोल्हापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये पाऊस नव्हता. तर नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी मंडळात हलक्या सरी पडल्या.

मराठवाड्यातही पाऊस कमी झालाय. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे ६० मिलिमीटर पाऊस झाला. तर कन्नड येथे पावसाचा शिडकावा झाला. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तर मुखेड येथेही हलक्या सरी झाल्या. बीड जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी आणि धारूर या मंडळांमध्ये पावसाच्या सरी पडल्या.

विदर्भातही काही मंडळांमध्ये मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. गोंदीया जिल्ह्यातील सालकेसा येथे ६० मिलिमीटर पाऊस झाला. तर सडकअर्जूनी, आमगाव, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव, गोंदीया आणि देवरी या मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली.

तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे ५० मिलिमीटर पाऊस झाला. तसचं सिरोंचा, चार्मोशी, हमरागड, मुलरेचा मंडळांमध्ये पावसाची हेजरी होती. चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली.

हवामान विभागानं मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली, आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा इशार दिला आहे. तर संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com