Weather Update : पावसाची उघडीप शक्य

अंदमान समुद्रातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रापासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमा दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हरियाना आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशाच्या बहुतांश भागांतून परतले (Monsoon Update) आहे. मॉन्सून दोन दिवसांत देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात परतीच्या पावसाने दणका दिल्यानंतर आता राज्यात पाऊस (Rain Update) उघडीप देण्याची चिन्हे आहेत. आजपासून (ता. २३) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाची शक्यता (Dry Weather Forecast) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Crop Damage : मराठवाड्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

अंदमान समुद्रातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रापासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमा दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हरियाना आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. राज्यासह संपूर्ण देशातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान झाल्याने सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंत मॉन्सून देशातून माघारी परतण्याची शक्यता आहे.

Weather Update
Crop Damage : बारामती तालुक्यात पिकांचे ३७४५ हेक्टरवर नुकसान

शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी दिवसभर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात ढगाळ हवामान होते. आज (ता. २३) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कमी दाब क्षेत्र झाले तीव्र

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत तयार झालेले कमी दाब क्षेत्र वायव्येकडे सरकत असून, त्याची तीव्रता वाढत आहे. ही प्रणाली पोर्ट ब्लेअरपासून ११० वायव्येकडे, सागर बेटापासून १४६० किलोमीटर, तर बांग्लादेशाच्या बरिसाल पासून ११३० किलोमीटर आग्नेयेकडे आहे. सोमवारपर्यंत (ता. २४) उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. ही वादळी प्रणाली उत्तरेकडे वळून तिंकोना बेटे आणि सॅण्डवीप जवळ बांगलादेशाच्या किनाऱ्याला धडकण्याचे संकेत आहेत.

कोकण : रोहा १००, दापोली ३०.

मध्य महाराष्ट्र : सांगली, अकोले प्रत्येकी ३०, शिरोळ ६०, कोल्हापूर, एरंडोल, तासगाव प्रत्येकी ५०, हातकणंगले, कसबेडिग्रज प्रत्येकी ४०, सासवड, सिन्नर, गगनबावडा प्रत्येकी ३०. मराठवाडा : उस्मानाबाद ४०, केज ३०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com