Monsoon Update : उत्तर विदर्भातून मॉन्सून परतला

मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनने उत्तर भारतासह उत्तर विदर्भातून माघार घातली असल्याचे हवामान विभागाने म्हटलंय.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

पुणेः मॉन्सूनचा परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) वेगाने सुरू झाला आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनने (Monsoon Update) उत्तर भारतासह उत्तर विदर्भातून माघार घातली असल्याचे हवामान विभागाने (Weather Department) म्हटलंय. तर आज राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी पडल्या. हवामान विभागानं राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Heavy Rain Yellow Alert) जारी केलाय.

Monsoon Update
Monsoon Update : राज्याच्या या भागातून माॅन्सून परतला

परतीच्या प्रवासात मॉन्सूनची वाटचाल अडखळत सुरू होती. शुक्रवारी मॉन्सूनने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरातच्या संपूर्ण भागासह, मध्य प्रदेशचा बहुतांशी भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि बहुतांश खाणदेशासह महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मॉन्सून परतला आहे. तर शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनने बहुतांश उत्तर भारत आणि मध्य भारतातून माघार घेतली आहे.

Monsoon Update
Monsoon Update : खानदेशच्या बहुतांश भागांतून मॉन्सून परतला

शनिवारी संपूर्ण बिहार, सिक्कीम, मेघालय, मध्य प्रदेशसह आसाम त्रिपुरा पश्चिम बंगालचा काही भाग, छत्तीसगड विदर्भासह महाराष्ट्राचा आणखी काही भागातून मॉन्सून परतला आहे. लामडिंग, कैलाशहर, पूर, बिलासपूर, ब्रेहरामपूर ब्रह्मपूरी, बुलढाणा, डहाणू पर्यंतच्या भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतला आहे. मान्सूनच्या परतीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत विदर्भ, छत्तीसगड, अंतर्गत महाराष्ट्र, झारखंड ओडिशाच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पुणे शह आणि परिसरात काल सायंकाळी जोरदार पाऊस पडला. तर नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि श्रीरामपूर मंडळात ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर इतर मंडळांमध्येही हलक्या ते मध्यम सरी पडल्या. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर हलक्या सरी सर्वत्र झाल्या

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पार्थी मंडळात ९० मिलिमीटर पाऊस झाला. पुर्णा, गंगाखेड, परभणी मंडळात जोरदार सरी पडल्या. तर बीड जिल्ह्यातील आष्टी येथे ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली. तर विदर्भात तुलनेत पावसाचा जोर कमी होता. मात्र बुलडाणा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या.

हवामान विभगानं उद्या सकाळपर्यंत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि नगर तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. तसचं विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com