राज्यातील अनेक भागांत माॅन्सून सरी!

राज्यातील अनेक भागांत माॅन्सून सक्रिय झाला. हवामान विभागाने आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता.
Monsoon Rain Update
Monsoon Rain UpdateAgrowon

राज्यात सध्या ठिकाठिकाणी पावसाची (Rainfall) हजेरी सुरु आहे. तसेच इतर राज्यांतही पावसाला सुरुवात झाली. मात्र पाऊस सर्वत्र नाही. राज्यात शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवडा आणि विदर्भातील अनेक भागांत पाऊस (Rain Update) झाला. मात्र माॅन्सूनचा (Monsoon) मुक्काम सोमवारपासून एकाच भागात असल्याचे हवामान विभागाने (Weather Department) जाहीर केले. तर राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची (Heavy Rain) प्रतिक्षा कायम आहे.

Monsoon Rain Update
विक्रमी खरीप पेरणीचे उद्दिष्ट साध्य होईल का?

राज्यातील अनेक भागांत माॅन्सून सक्रिय झाला. हवामान विभागाने आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. तर मुंबईसह, उर्वरीत कोकण, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, विदर्भातील चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार अनेक भागांत दुपारी पावसाने हजेरी लावली. तर बहुतेक भागांत पावसासाठी पोषक हवामान आहे.

आज दुपारपर्यंत पूर्व विदर्भातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. तर मराठवाड्यातही दुपारपर्यंत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोकणात मात्र पावसाचा जोर अधिक होता. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही चांगला पाऊस झाला. मात्र अद्यापही अनेक भागांत जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी पावसाची प्रतिक्षा करत आहेत. पुढील पंधरा दिवसांतील पाऊस खरिपासाठी महत्वाचा असणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com