Monsoon Update : मॉन्सून लवकरच परतीच्या प्रवासावर

नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) लवकरच परतीच्या प्रवासावर निघण्याचे संकेत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वायव्य भारतातील राजस्थानातून मॉन्सून माघारी फिरण्यास पोषक हवामान होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
Monsoon Update
Monsoon Update Agrowon

पुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) (Monsoon) लवकरच परतीच्या प्रवासावर निघण्याचे संकेत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वायव्य भारतातील राजस्थानातून मॉन्सून माघारी फिरण्यास पोषक हवामान होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा सर्वसाधारण वेळेच्या आधी मॉन्सून वायव्य भारतातून काढता पाय घेण्याची शक्यता आहे.

Monsoon Update
Rain : जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

हवामान विभागाने (Weather Department) २५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या दोन आठवड्यांच्या कालावधीसाठीचा हवामान अंदाज (Weather Forecast) गुरुवारी (ता. २५) जाहीर केला. यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानातून मॉन्सून परतण्यास (Return Journey Of Monsoon) पोषक वातावरण तयार होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पूर्वी १ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र २०२० मध्ये मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Monsoon Update
Rain : जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब

यंदाच्या हंगामात सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधी २९ मे रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. अरबी समुद्रातून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सून गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी (ता. ९) मॉन्सून तळकोकणात दाखल झाला. त्यानंतर १५ जून रोजी मॉन्सूनने जवळपास महाराष्ट्र व्यापला. पुढील वाटचालही काहीशी अडखळत झाली. तरीही नियमित सर्वसाधारण वेळेच्या ६ दिवस आधीच मॉन्सूनने देश व्यापला. २ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशभरात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

महाराष्ट्रात पडला २३ टक्के अधिक पाऊस

मॉन्सून हंगामात शुक्रवारपर्यंत (ता. २६) देशभरात ७१७.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर मॉन्सून मुक्तहस्त कोसळल्याने महाराष्ट्रात ९४८ मिलिमीटर (२३ टक्के) अधिक पाऊस पडला आहे. कोकणात सरासरी इतका तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अद्यापही महिनाभराचा हंगाम शिल्लक असल्याने या काळात किती पाऊस पडणार, याकडे शेतकऱ्याचे लक्ष आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com