माॅन्सून ४८ तासांत महाराष्ट्रात येणार!

यंदा तीन दिवस आधीच म्हणजेच २९ मे रोजी मॉन्सूनचं देवभुमी केरळ मध्ये आगमन झालं. त्यानंतर दोनच दिवसांत मॉन्सूनने संपूर्ण केरळ राज्य, कर्नाटक किनारपट्टी व्यापून गोव्याच्या किनाऱ्यापर्यंत मजल मारली.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी व्यापून माॅन्सून (Monsson) आठवडाभर गोव्याच्या उंबरठ्यावर मुक्काम ठोकूनये. त्यामुळं राज्यातील शेतकरी चातकाप्रमाणं माॅन्सूनची वाट (Monsoon Update) पहातायेत. मात्र मॉन्सूनच्या आगमनाची (Monsoon Arrival) प्रतीक्षा आता संपणारे. माॅन्सून ४८ तासांत तळ कोकणातून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविलीये.

यंदा तीन दिवस आधीच म्हणजेच २९ मे रोजी मॉन्सूनचं देवभुमी केरळ मध्ये आगमन झालं. त्यानंतर दोनच दिवसांत मॉन्सूनने संपूर्ण केरळ राज्य, कर्नाटक किनारपट्टी व्यापून गोव्याच्या किनाऱ्यापर्यंत मजल मारली. त्यानंतर दोन दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असतानाच मॉन्सूनचा वेग मंदावला. अरबी समुद्रावरून आठवडाभरापेक्षा अधिक काळ मॉन्सूनची प्रगती झाली नाही. कारवार, चिकमंगळूरू, बंगळूरूपर्यंतच्या भागात मॉन्सूनची सीमा कायमये.

आता मात्र मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान झालंय. शनिवारपर्यंत माॅन्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भाग, संपूर्ण तमिळनाडू, आंध्रप्रदेशासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत दाखल होण्याची शक्यताये. सोमवारपर्यंत मॉन्सून संपूर्ण कर्नाटक व्यापून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत पोचण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com