माॅन्सूनचा प्रवास मंदावला

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मॉन्सूनने गुरुवारी (ता.१६) बहुतांश राज्य व्यापल्यानंतर मुक्काम केला. शुक्रवारी (ता.१७) माॅन्सूनने राज्यात प्रगती केली नाही.
माॅन्सूनचा प्रवास मंदावला
Monsoon UpdateAgrowon

पुणेः नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मॉन्सूनने (Monsoon) गुरुवारी (ता.१६) बहुतांश राज्य व्यापल्यानंतर (Monsoon Covered Maharashtra) मुक्काम केला. शुक्रवारी (ता.१७) माॅन्सूनने राज्यात प्रगती केली नाही. तर पुढील तीन दिवसांत माॅन्सून संपूर्ण राज्य व्यापून आणखी काही राज्यांपर्यंत मजल मारेल, असा अंदाज हवामान विभागाने जाहिर केला. (Monsoon Update)

केरळात वेळेआधी पोचून ३१ मे पर्यंत गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी मॉन्सूनने कोकणात प्रवेश केला. तर मजल दरमजल प्रवास करत माॅन्सूनने गुरूवारी (ता. १६) गोंदीयाचा काही भाग वगळता राज्य व्यापले. गुरुवारी मोठी मजल मारून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापत गोंदिया पर्यंत धाव घेत विदर्भाच्या बहुतांश भागात मॉन्सून पोचला होता. तर उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशाच्या काही भाग, संपूर्ण तेलंगणासह आंध्र प्रदेशचा बहुतांशी भागात माॅन्सून पोचला.

पुढील तीन दिवसांत मॉन्सून संपूर्ण विदर्भ, आंध्र प्रदेशसह बंगालचा उपसागर व्यापून छत्तीसगड, ओडिशाच्या आणखी काही भागासह झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांत दाखल होण्यास पोषक हवामान आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com