Electricity : शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती; पण किमान चालू बिल भरा

आदिनाथ कारखान्याच्या गळीत हंगामप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांची अपेक्षा
Electricity
ElectricityAgrowon

करमाळा, जि. सोलापूर : शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन (Electricity Connection) तोडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी चालू वीजबिल (Electricity Bill) भरले पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता.२५) व्यक्त केली.

Electricity
Agriculture Electricity : कृषिपंपांची वीजजोडणी तोडण्यास सुरुवात

करमाळा तालुक्यातील शेलगाव-भाळवणी येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या गळीत हंगामप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री राम शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘आदिनाथ कारखाना भाड्याने किंवा विकत घेण्यासाठी अनेक दिग्गज टपलेले होते. या दिग्गजांच्या तावडीतून हा कारखाना वाचवण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल यांनी विशेष प्रयत्न केले. तानाजीराव सावंत यांनी या कारखान्यासाठी विशेष मदत केली आहे. हा कारखाना सुरळीतपणे चालणार आहे, यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा. हा कारखाना सुरळीत चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रकारची मदत केली जाईल. करमाळा तालुक्यातील रखडलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण तत्पर आहोत. ज्या पद्धतीने कारखान्यासाठी एकत्र आलेला आहात, त्याच पद्धतीने तालुक्याच्या विकासासाठी एकत्र या,’’ असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी रश्मी बागल, नारायण पाटील यांना यावेळी केले.

‘रिटेवाडी उपसा योजना मार्गी लावू’

माजी आमदार नारायण पाटील यांनी, ‘‘करमाळा तालुक्यात रिटेवाडी उपसा सिंचन सारखी योजना राबवल्यास ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे,’’ अशी मागणी केली. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी यासाठी तत्काळ जलसंपदा विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा शब्द दिला.

Electricity
Agriculture Electricity : ‘चालू बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापावी’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com