Irrigation : मोरदड ते खोरदड पाटचारी दुरुस्तीच्या कामास प्रारंभ

गिरणा डावा कालवा अंतर्गत येणाऱ्या मोरदड ते खोरदड पाटचारी दुरुस्तीच्या कामास प्रारंभ झाला.
Irrigation
IrrigationAgrowon

सोनगीर, जि. धुळे : गिरणा डावा कालवा (Girana Canal) अंतर्गत येणाऱ्या मोरदड ते खोरदड पाटचारी (Patchari) दुरुस्तीच्या कामास प्रारंभ झाला. धुळे तालुक्यात शेती सिंचनासाठी (Agriculture Irrigation) पाटचाऱ्यांची दुरुस्तीकडे आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या प्रयत्नामुळे शेकडो एकर शेतीला फायदा होणार असून, लवकरच शिरूड परिसरातील शेतकऱ्यांसाठी गिरणा डावा कालव्याचे पाणी सोडण्यात येणार आहे.

Irrigation
Irrigation Scheme : प्रकाशा-बुराई योजनेला मान्यता द्यावी; शेतकऱ्यांची मागणी

आमदार पाटील यांच्या प्रयत्नाने लवकरच गिरणा डावा कालव्याची व तालुक्यातील उर्वरित पाटचाऱ्यांचीही दुरुस्ती होणार आहे. गिरणा डावा कालवा अंतर्गत शिरूड (ता. धुळे) परिसरात विविध गावांतील शेतीला सिंचनासाठी पाटचाऱ्या काढल्या आहेत. त्याचा लाभ परिसरातील शेकडो एकर शेतीला होतो.

Irrigation
Irrigation : ‘चित्री’चे पहिले आवर्तन १५ जानेवारीपासून

पाटचाऱ्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी होती. आमदार पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांना दुरुस्तीबाबत सूचना दिल्या. तसेच सिंचन विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील यांच्याशी दुरुस्तीबाबत चर्चाही केली. त्यानुसार मोरदड ते खोरदड या पाटचारीच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला. बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतकर, ॲड. बी. डी. पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती जयंत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

परिसरातील शेकडो एकर शेतीला सिंचनासाठी फायदा होईल. मोरदड खोरदडसह चांदे, तरवाडे, विंचूर या परिसरातील विविध पाटचाऱ्यांचीही लवकरच दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे. या वेळी कृउबा माजी सभापती गुलाब कोतेकर, अशोक पाटील, स्वीय सहायक रामकृष्ण पाटील, कालवा निरीक्षक एस. एस. शेळके, योगेश पाटील, भीमराव पाटील, भारत पाटील, जगदीश पाटील, अधिकार पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, भिका ठेलारी, प्रणव पाटील, गोरख भदाणे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com