आसाममध्ये ११ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका

आसाममध्ये मागील काही दिवसांपासून पुराने थैमान घातले आहे.
आसाममध्ये ११ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका
Assam FloodAgrowon

गुवाहाटी ः आसाममध्ये मागील काही दिवसांपासून पुराने (Flood) थैमान घातले आहे. सततच्या पूर परिस्थितीमुळे लाखो लोकांचे जीवन प्रभावित झाले आहे. राज्यातील तब्बल २५ जिल्ह्यांतील ११.०९ लाख लोक पूर आणि भूस्खलनामुळे (Land Sliding) बाधित झाले आहेत. दरम्यान दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आसाम सरकारने (Assam Governmrnt) दिली.

राज्यातील मानस, पगलाडिया, पुथिमारी, कोपिली, गौरांग आणि ब्रह्मपुत्रा नद्यांची पाण्याची पातळी प्रचंड वाढली असून, या नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत, अशी माहिती आसाम सरकारकडून देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com