Sugarcane : सोलापूर जिल्ह्यात ५० हून अधिक ट्रॅक्टरचे टायर फोडले

ऊसदराची बैठक फिस्कटल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक
Sugarcane
SugarcaneAgrowon

सोलापूर ः ऊसदरासंबंधी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी सोमवारी (ता. ३१) साखर कारखानदार (Sugar Mill) आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक बोलावत, ऊसदरावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण कोणत्याही निर्णयाविना ही बैठक निष्फळ ठरल्याने ऊसदर संघर्ष समिती आक्रमक झाली असून, सोमवारी रात्रीपासून ते आज मंगळवारी (ता. १) दिवसभरात जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात सुमारे ५० हून अधिक ट्रॅक्टरचे टायर फोडत आंदोलन तीव्र केले.

Sugarcane
Crop Insurance : पीकविमा तक्रारींसाठी संपर्क क्रमांक जाहीर

उसाला पहिली उचल २५०० रुपये आणि अंतिम दर ३१०० रुपये द्यावा, अशी ऊसदर संघर्ष समितीची मागणी आहे. पण या बैठकीत एक-दोन कारखान्यांनी तशी तयारी दाखवली. पण बहुतांश कारखानदारांनी नकार दर्शविताना २००० रुपयांच्या पुढे जाण्याची तयारी नसल्याचे दाखवले. त्यामुळे संतप्त झालेले ऊसदर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आता आक्रमक पवित्रात घेतला.

बैठक संपताच सोमवारी दुपारी क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रकवर आरटीओ कार्यालयात स्वतःला कोंडून घेत, कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. ठोस आश्‍वासनंतर ही माघार घेतली, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मंगळवारी (ता. १) कार्यकर्ते आक्रमक झाले.

बार्शी-कुर्डवाडी रस्त्यावर शेंद्री स्टेशननजीक रिधोरेमध्ये आंदोलकांनी ट्रॅक्टरचे चारही टायर फोडले. त्याशिवाय पंढरपुरातील पिराची कुरोली फाटा, दसूर पाटील, शेळवे, जुना अकलूज रस्ता, मंगळवेढा आणि मोहोळमध्ये सुमारे ५० हून अधिक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले.

पहिली उचल २५०० रुपये घेतल्याशिवाय कारखान्याची धुराडी सुरू करू नयेत, आम्ही आता माघार घेणार नाही, कारखानदार आणि प्रशासनानंही, हे लक्षात घ्यावं.

- दीपक भोसले, समन्वयक, ऊसदर संघर्ष समिती, सोलापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com