Pakistan Flood : पाकिस्तानात पावसाचे ९०० हून अधिक बळी

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कराची, पंजाब, बलुचिस्तान प्रांतातील स्थिती चिंताजनक बनली आहे. देशभरात आतापर्यंत ९०० हून अधिक जणांचे बळी गेले आहेत.
Pakistan Flood
Pakistan FloodAgrowon

इस्लामाबाद : मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि पुरामुळे कराची, पंजाब, बलुचिस्तान प्रांतातील स्थिती चिंताजनक (Pakistan Flood Update) बनली आहे. देशभरात आतापर्यंत ९०० हून अधिक जणांचे बळी गेले आहेत. हवामान खात्याने आणखी मुसळधारेचा अंदाज (Heavy Rain Forecast) वर्तविला आहे. बलुचिस्तानमध्ये आतापर्यंत पावसाचे २३४ बळी गेले आहेत. खैबर पख्तुनख्वा येथे १८५ आणि पंजाब प्रांतात १६५ जणांचा मृत्यू झाला. गिलगिट बाल्टिस्तान येथे नऊ जणांचा मृत्यू झाला. देशाची ढासळती स्थिती पाहता राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency Announced In Pakistan) जाहीर करण्यात आली आहे.

Pakistan Flood
Flood : वर्धा नदीच्या पुरामुळे अकरा गावांना पुराचा वेढा

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालात म्हटले, की चौदा जूननंतर आतापर्यंत सिंध प्रांतात ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘डॉन’ने म्हटले, की मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूर आला असून, आतापर्यंत ९३७ जणांचे बळी गेले आहेत. यात ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. पाकिस्तानात ऑगस्ट महिन्यांत २४१ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. या ठिकाणी सरासरी १६६.८ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. दरवर्षी सरासरी ४८ मिलिमीटर पावसाची नोंद असताना यंदा पावसाने विक्रम केला आहे. सिंध प्रांतातील २३ जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला.

Pakistan Flood
Flood: पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती

पाकच्या सैनिकांना पाचारण

हवामान बदल खात्याचे मंत्री शेरी रेहमान यांनी सांगितले, की पाकिस्तानचे सैनिक आणि स्थानिक प्रशासन बचाव कार्यात वेगाने काम करत आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. देशभरात सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. काही छावण्यांमध्ये लोकांना पुरेसे अन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेकडो लोकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. बलुचिस्तान प्रांतातील बेघर लोकांसाठी सुमारे एक लाख छावण्यांची मागणी केली आहे. पूरग्रस्तांना होणारी मदत अपुरी पडत असल्याने पाकिस्तान सरकारने अन्य देशांकडून मदत मागितली आहे. पाकिस्तान सरकारला सध्या ५.७८ लाख कोटी रुपयांची गरज आहे. आरोग्य खात्याला १२.९ हजार कोटी रुपये हवे आहेत.

८२ हजार घरांची हानी

माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी म्हटले, की पुरामुळे ८२ हजार घरांची हानी झाली आहे. त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी सुमारे ४१ अब्ज रुपये (३.२७ लाख कोटी भारतीय रुपये) खर्च येणार आहे. म्हणजेच प्रत्येक घराला ५० हजार रुपये लागणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com