Assam Flood : आसाममध्ये तीस लाखांहून अधिक नागरिक बेघर

पावसामुळे आसाममधील काही नद्यांचा पूर अद्याप कायम आहे. राज्यातील २६ जिल्ह्यांत ३१.५४ लाखांपेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत.
Assam Flood
Assam FloodAgrowon

गुवाहाटी (पीटीआय) : पावसामुळे आसाममधील काही नद्यांचा पूर (Assam Flood) अद्याप कायम आहे. राज्यातील २६ जिल्ह्यांत ३१.५४ लाखांपेक्षा अधिक नागरिक बेघर (People Homeless Due To Flood) झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. कच्चर आणि चिरांग जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच बारपेटा, विश्‍वनाथ, दरांग, धेमाजी, गोलाघाट, कामरूप मेट्रोपॉलिटन, लखीमपूर आणि नागाँव येथे प्रत्येकी एक जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी राज्यात गेल्या तीन महिन्यांत पूर आणि दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Assam Flood
महाराष्ट्राचं सोडा, पूरग्रस्त नागरिकांना मदत करा: ममता बॅनर्जींच्या आसाम सरकारला कानपिचक्या

लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आसाम पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान आणि अन्य स्वयंसेवक पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. अहोरात्र काम करणारे जवान पूरग्रस्तांना अन्नाची पाकिटे आणि निवाऱ्याची सोय करून देत आहेत. राज्यातील बजली, बारपेटा, कच्छार, विश्‍वनाथ, चिरांग, धेमाजी, दरांग, दिब्रुगड, दीमा हसाओ, गोलपारा, गोलाघाट, हैलाकांडी, होजईल, कामरूप, करीमगंज, माजुली, मोरीगाव, नागाँव, नलबारी, सोनीतपूर, तामुलपूर, तिनसुखिया आणि उदलगुरी जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

कच्छार येथे सलग दुसऱ्या दिवशी पूरस्थिती गंभीर राहिली आहे. त्यामुळे १४.३१ लाख लोकांना फटका बसला आहे. एकट्या सिल्चर जिल्ह्यात किमान ७,२५,३०६ जणांना पुराचा फटका बसला आहे. दक्षिण आसाम शहरातील काही भाग दहाव्या दिवशीही पाण्याखालीच राहिला आहे. बारपेटा येथे ५.४९ लाख लोकांना पुरामुळे बेघर व्हावे लागले आहे. तसेच नागॉंव येथे पाच लाखाहून अधिक नागरिकांना अन्य ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. ब्रह्मपुत्रा आणि उपनद्यांमुळे सुमारे २६७५ गावांत पाणी शिरले आहे. दुसरीकडे ९१,३४९ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com