Agri Student Protest : आंदोलनात कृषी अभियांत्रिकीचे दोनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१-२०२२ ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावे, स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे.
Student Protest
Student ProtestAgrowon

दापोली, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१-२०२२ ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावे, स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे. यासह विविध मागण्यांसाठी कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन (Agri Student Protest) सुरू केले आहे.

Student Protest
Student Protest : विद्यार्थ्यांचा राज्यातील कृषी विद्यापीठांत ठिय्या

दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात दोनशेहून अधिक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Student Protest
Agri Student Protest : कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरू

आंदोलनाचा हा सातवा दिवस आहे. राज्य कृषी सेवा परीक्षेत कृषी व अभियांत्रिकी यांचे पूर्वीप्रमाणेच वैकल्पिक पेपर ठेवण्यात यावेत व तोपर्यंत राज्य कृषी मुख्य परीक्षा २०२१ व २०२२ सेवेच्या वरील दोन्ही जाहिरातींना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी विनंती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघातर्फे एका पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com