Telhara News : तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची सर्वाधिक धूळधाण

वर्षानुवर्षे तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती रखडलेली असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Telhara News : तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची सर्वाधिक धूळधाण

तेल्हारा, जि. अकोला ः वर्षानुवर्षे तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती (Damage Road) रखडलेली असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले असून, या भागाचे नेतृत्व करणाऱ्या आमदारांनी जबाबदारी स्वीकारून एक वेळा हिवरखेड-तेल्हारा-आडसूळ (Telhara Road) या मार्गाने प्रवास करूनच दाखवा, असे आवाहन आता नागरिक देत आहेत. यावरून रस्त्याच्या दुरवस्थेची परिस्थिती किती भीषण बनली हे लक्षात येते.

Telhara News : तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची सर्वाधिक धूळधाण
Soybean Market : बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्रीसाठी झुंबड

एक-दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्ते संबंधित कंत्राटदाराने खोदून ठेवले आहेत. यामुळे पावसाळ्यामध्ये चिखलाचा व नंतर धुळीचा सामना करावा लागतो. रस्त्यावर माती मिश्रित मुरूम टाकण्यात आल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या शेतांमध्ये पीक घेणेही कठीण झाले आहे. शिवाय रस्ते चांगले नसल्याने शेतमाल विक्रीला नेताना शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

Telhara News : तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची सर्वाधिक धूळधाण
Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीनची स्थिती काय ?

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा या निमित्ताने निर्माण झाला आहे. रस्त्यांवरील धूळ पिकांवर बसत असल्यामुळे उत्पादन कमी येत आहे. चार ते पाच वर्षांपासून तालुक्यातील चारही भागांतील रस्त्यांचा प्रश्‍न रखडल्यामुळे या भागाचे नेतृत्व करणारे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

या भागातील भाजपच्या पदाधिकारी, नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी रस्त्यांची दयनीय अवस्था बघावी, यासाठी हिवरखेड ते तेल्हारा व तेल्हारा ते आडसूळ, तेल्हारा ते पाथर्डी व तेल्हारा ते माळेगाव बाजार या रस्त्याने मोटरसायकलीने प्रवास करून दाखवावा असे आव्हानच दिले जाऊ लागले आहे. या तालुक्यातील रस्ते जिल्ह्यात सर्वाधिक खराब झालेले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com