Farmer Suicide: सर्वाधिक शेतमजुरांच्या आत्महत्या महाराष्ट्रात

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) ताज्या अहवालानुसार, 2021 मध्ये दर दोन तासांत किमान एका शेतमजुराने आत्महत्या केली आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार 2021 मध्ये सुमारे 5,563 शेतमजुरांनी आत्महत्या केली.
Farmer Suicide
Farmer Suicide Agrowon

नैसर्गिक संकटे (Natural Calamity), शेती उत्पादनातील घट (Decline In Agriculture Produce Production) आणि त्यामधून आलेल्या नैराश्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) वाढतच आहेत. शेती व्यवसयात प्रगती होत असली तरी वाढत्या आत्महत्या या वास्तवाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. अशातच शेतमजुरांच्याही आत्महत्यांचे (Agriculture laborers Suicide) प्रमाण वाढत आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) ताज्या अहवालानुसार, 2021 मध्ये दर दोन तासांत किमान एका शेतमजुराने आत्महत्या केली आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार 2021 मध्ये सुमारे 5,563 शेतमजुरांनी आत्महत्या केली. 2020 च्या तुलनेत आत्महत्यांच्या संख्येत नऊ टक्के वाढ झाली आहे, तर 2019 च्या तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण 29 टक्क्यांनी वाढले आहे. 5,563 मृतांपैकी 5,121 पुरुष असून 442 महिला होत्या.

Farmer Suicide
Farmer Suicide : शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्रासाठी...

भारतातील सर्वाधिक शेतमजुरांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या असून मृतांचा आकडा 1,424 इतका आहे. यानंतर कर्नाटकात 999, आंध्रप्रदेश मध्ये 584 शेतमजुरांनी आत्महत्या केली आहे. अहवालात शेतकरी आणि शेतमजूर यांची स्वतंत्र आकडेवारी नोंदवण्यात आली आहे. स्वत:च्या मालकीची जमीन असलेले जमीन असलेले आहेत आणि ते त्याची लागवड करतात, तर शेतमजूर म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत इतरांच्या शेतात काम करतात.

कोव्हीडनंतर बरेच अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर बनले आहेत. तसेच शेतमजुरीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 2021 च्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 77 व्या फेरीत यासंबंधीचं चित्र अगदी स्पष्ट दिसून आलं होतं. या सर्वेक्षणानुसार, एका शेतकरी कुटुंबाचं सर्वाधिक उत्पन्न हे 4,063 रुपये इतकं होतं. आणि शेतमजूरीच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळाल्याचं सर्वेक्षणात दिसून आलं होतं.

Farmer Suicide
Farmer Suicide : मराठवाड्यात सहा महिन्यांत ४६६ शेतकरी आत्महत्या

सर्वसाधारण चित्र

गेल्या दोन वर्षांत शेतमजुरांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये काही अंशी घट झाल्याचं चित्र आहे. आत्महत्येची आकडेवारी बघता 2019 मध्ये 5,957 तर 2020 मध्ये 5,579 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तीच संख्या घटून 2021 मध्ये 5,318 झाली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही ही आकडेवारी सर्वाधिक होती. एकूणच, शेतमजुरांच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत घट झाल्याचं सर्वसाधारण चित्र या अहवालात दिसून आलं आहे. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकात मात्र हे चित्र उलट आहे. या दोन्ही राज्यांत शेतमजुरांच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रात 2,640 तर कर्नाटकात 1,170 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

2019, 2020 मध्येही सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या होत्या. 2021 मध्ये शेती क्षेत्रात गुंतलेल्या 10,881 लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. देशातील एकूण आत्महत्याग्रस्तांशी याची तुलना करता ही आकडेवारी 6.6 टक्के इतकी आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, चंदीगड, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्यांची संख्या शून्य इतकी नोंदवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, 2021 मध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2021 मध्ये हे प्रमाण 25 टक्क्यांवर गेलं असून 42,004 आत्महत्यांची नोंद झाली आहे. 2020 मध्ये हीच आत्महत्येची संख्या 33,164 इतकी होती. त्यात 2021 मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com