ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, 'अॅमेझॉन'मध्ये सामंजस्य करार

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक सहयोग आणि शेतकरी मार्गदर्शन या महत्त्वपूर्ण बाबींच्या अनुषंगाने सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या.
Agriculture Development Trust
Agriculture Development TrustAgrowon

माळेगाव ः ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि अॅमेझॉनच्या (MoU Between Agriculture Development Trust And Amazon) अधिकाऱ्यांनी तांत्रिक सहयोग आणि शेतकरी मार्गदर्शन या महत्त्वपूर्ण बाबींच्या अनुषंगाने सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या. यापुढे अॅमेझॉनच्या (Amazon) भारतातील सर्व संकलन केंद्रावर प्रत्यक्ष तसेच डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे (Digital Technology) शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अमेझॉन प्लॅटफॉर्मचा वापर बारामती ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रातील शास्रज्ञ करू शकणार आहेत. विषमुक्त पीक उत्पादन, काढणी पश्चात तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाणार आहे.

Agriculture Development Trust
Agriculture Drone : शासन ‘ड्रोन शेती’च्या प्रसारासाठी प्रयत्न करणार

या कराचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचा तांत्रिक मार्गदर्शनाद्वारे कमी खर्चात अधिक उत्पादन व नफा मिळवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती बारामती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी दिली. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांनीही या उपक्रमाचे अभिनंदन केल्याचे त्यांनी सांगितले.

Agriculture Development Trust
Agriculture Supply Chain : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन

नलावडे म्हणाले, ‘‘अॅमेझॉनचे तंत्रज्ञान आणि केव्हीकेचा शेती क्षेत्रातील अनुभव व कार्य देशातील शेतकऱ्यांना ज्ञान मिळण्यासाठी हा सामंजस्य करार फायद्याचा ठरेल. राज्यातील प्रगत शेतीची गाथा सर्वत्र पोहचेल. हवामान बदलाच्या वाढत्या समस्येत अडचणीत सापडलेल्या शेतीला आणि शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी या दोन्ही संस्थांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल. महिला बचत गट व शेतकरी उत्पादन कंपन्यांची उत्पादने अॅमेझॉनमार्फत ग्राहकांपर्यंत पोचविण्याचेही उद्दिष्ट आहे.’’

शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी म्हणाले,‘‘ विषमुक्त शेती कशी करावी, पर्यावरणाचा समतोल राखून प्रगत तंत्रज्ञानाद्वारे पीक उत्पादन कसे घ्यावे, यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत (नवी दिल्ली) तयार केलेली नियमावली देशात पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’

अमेझॉन किसान’चे सिद्धार्थ टाटा म्हणाले, ‘‘भारतात इंटरनेटच्या प्रसारामुळे शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे. याच कारणाने शेतीत उत्पादकता १५-२० टक्के वाढली आहे. केव्हीके ही शेती तंत्रज्ञान विकासात अग्रण्य संस्था आहे. संस्थेबरोबर करार करून अमेझॉन शेती क्षेत्रातही नवीन तंत्रज्ञान आणण्यास कटिबद्ध राहील.’’ अॅमेझॉनच्या कृषी नियामक विभागाचे डॉ. शशीन शोभणे, स्वाती नायक, प्रदीप भापकर, केव्हीकेचे प्रमुख धीरज शिंदे, संतोष गोडसे उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com