Citrus Crop : लिंबूवर्गीय संस्था आणि शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठात सामंजस्य करार

लिंबूवर्गीय फळ संशोधनाला चालना मिळण्याच्या उद्देशाने केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था तसेच जम्मू- काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
Citrus Crop MoU
Citrus Crop MoUAgrowon

नागपूर : लिंबूवर्गीय फळ संशोधनाला (Citrus Crop Research) चालना मिळण्याच्या उद्देशाने केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था तसेच जम्मू- काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठ (Kashmir Agriculture University) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष तसेच कुलगुरू डॉ. जे. पी. शर्मा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेची स्थापना जुलै १९८५ मध्ये करण्यात आली. देशात लिंबूवर्गीय पीक संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात ही संस्था काम करत असून, देशभरातील वेगवेगळ्या भागांत तंत्रज्ञान विकास, मूल्यांकन आणि प्रसार चाचण्यांवर संस्थेने भर दिला आहे.

Citrus Crop MoU
Orange Crop Management : संत्रा बागेतील कीड, रोग, खत व्यवस्थापन

त्याच धोरणांतर्गत जम्मू भागात लिंबूवर्गीय पिकांच्या लागवडीची सुधारित तंत्रज्ञान पद्धती, हवामानानुसार प्रतिसाद देणाऱ्या जातीची निवड याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. संत्रा, मोसंबी, लिंबू, ग्रेपफ्रूट आणि पमेलोच्या अनेक आशादायक लिंबूवर्गीय जातीचे मूल्यांकन या भागात करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याकरिता शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठ, तसेच केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेचा संस्था यांच्यात संशोधनात्मकस्तरावर चाचण्यांकरिता सामंजस्य करार करण्यात आला.

Citrus Crop MoU
Orange Pest : संत्री, मोसंबीवरील पाने खाणारी अळी, सायला व्यवस्थापन

जम्मू, सांबा आणि कठुवा जिल्ह्यांतील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर लिंबूवर्गीय फळ पिकाच्याच बहुस्थानीय चाचण्या घेण्यात येणार आहेत. जम्मू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन सायट्रस बळकट करण्यासाठी सुविधा आणि आवश्यक संसाधनांचा पुरवठा देखील केला जाणार आहे. या वेळी डॉ. घोष यांनी जम्मू येथील हवामानानुसार तत्काळ वृक्षारोपणासाठी आणि मूल्यांकनासाठी १२ वेगवेगळ्या लिंबूवर्गीय जातीची १२५ रोपे विद्यापीठाकडे सुपूर्द केली. त्यातील काही रोपांची डॉ. घोष आणि डॉ. शर्मा यांच्या हस्ते चाथा येथील संशोधन प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आली. या भागीदारीचे उद्दिष्ट दोन संस्थांमधील शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य सुलभ करणे आहे.

देशातील लिंबूवर्गीय फळांचे नवीन उत्पादन केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आणि रोगमुक्त लागवड साहित्य उत्पादनासाठी शास्त्रोक्त पद्धतीने रोपवाटिका स्थापन करण्यात ही भागीदारी मैलाचा दगड ठरेल असा विश्‍वास डॉ. दिलीप घोष यांनी व्यक्त केला. याचा अन्न आणि उपजीविकेच्या सुरक्षेवर तसेच या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासावर मोठा प्रभाव पडेल असेही ते म्हणाले. या वेळी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. ए. मुरकुटे, ए. तिरुग्नावेल, डॉ. प्रादीप वाली, डॉ. ए. के. मॉडेल, डॉ. एस. के. गुप्ता उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com