Mihan Project : ‘मिहान’ प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

‘मिहान’ प्रकल्पासाठी सरकारने आठ हजार एकर जमीन अधिग्रहित केली आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांना अद्यापही वाढीव मोबदला देण्यात आला नाही. त्यांना घराची जागा मिळाली नाही.
Mihan Project
Mihan ProjectAgrowon

नागपूर ः ‘मिहान’ प्रकल्पासाठी (Mihan Project) शेकडो एकर शेतजमीन अधिग्रहित (Land Acquisition) करण्यात आली. मात्र प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळाला नाही, तो मिळावा या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी ‘मिहान’चे मुख्य अभियंता चॅटर्जी व अतिरिक्‍त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांची भेट घेतली.

Mihan Project
Nitin Gadkari : नाशिकला आयात-निर्यात क्षेत्रात अग्रगण्य करणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

‘मिहान’ प्रकल्पासाठी सरकारने आठ हजार एकर जमीन अधिग्रहित केली आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांना अद्यापही वाढीव मोबदला देण्यात आला नाही. त्यांना घराची जागा मिळाली नाही. प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शासकीय नोकरी मिळाली नाही. उद्योग-धंदे सुरू करण्यास आर्थिक साह्य देण्यासही टाळाटाळ करण्यात आली.

Mihan Project
‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना

बेरोजगारांना रोजगार नाही. दूध व्यवसायासाठी गुराढोरांना बांधण्याकरिता गोठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. साडेबारा टक्‍के जमीन मिळाली नाही. प्रकल्पासाठी जमीन संपादित झाल्याने उदरनिर्वाहाकरिता दुसरे कोणतेच साधन उरले नाही. यासह इतर विविध समस्यांकडे लक्ष्य वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मिहान प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली.

या वेळी सरकार योग्य मोबदला देत नसेल तर आमच्या जमिनी आम्हाला परत करा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनीही अधिकाऱ्यांशी चर्चा करीत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी केली. या वेळी सौरभ वानखडे, तुषार महाकाळकर, धीरज धोटे, शंकर जुमडे, गोपाळ वांगे, हरिदास वानखडे, श्रीकृष्ण चापले, हर्षल भगत, प्रवीण चापले, अमित जुमडे, सचिन तिवाडे, रोहित झंझाळ, किशोर भगत, सुनील चापले उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com