APMC Election : माघारीनंतरच पॅनेल निश्‍चितीची नेत्यांची रणनीती

जळगाव, अमळनेर, जामनेर, धुळ्यातील धुळे, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार या बाजार समित्यांच्या निवडणुकांना अधिकचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
apmc election
apmc electionAgrowon

Jalgaon News खानदेशात बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या (Khandesh APMC Election) हालचाली गतिमान झाल्या आहेत. सर्वच नेत्यांना बंडखोरी, नाराजी रोखण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागत असून, आता थांबून घ्या, पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संधी देऊ, अशी आश्‍वासने नेतेमंडळी देत आहे.

जळगाव, अमळनेर, जामनेर, धुळ्यातील धुळे, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार या बाजार समित्यांच्या निवडणुकांना अधिकचे महत्त्व प्राप्त झाले आहे. नंदुरबारात पालकमंत्री विजयकुमार गावित व शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी हे नाराज कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क साधून त्यांची समजूत काढत आहेत.

apmc election
APMC Election : कागदपत्रे जमविण्यासाठी इच्छुकांची धावपळ

जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आता थांबा, पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी देऊ, अशी समजूत काही पदाधिकाऱ्यांची काढली आहे.

जामनेरात ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी देखील कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या व माघारीनंतर पॅनेल तयार करण्याची भूमिका तूर्त घेतली आहे.

अमळनेरात भाजपमधील कलक दूर करण्यासंबंधी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. शहादा बाजार समितीत पारंपरिक विरोधात असलेले दीपक पाटील व अभिजित पाटील यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यावर अधिकचा वेळ दिला आहे.

apmc election
APMC Election : शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका

धुळ्यात काँग्रेस व भाजप, अशी सरळ लढत होणार आहे. पण भाजपमध्ये स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा रोखण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे सक्रिय असून, त्यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

शिरपुरात आमदार अमरिश पटेल यांनी देखील माघारीनंतर पॅनेल, अशी भूमिका घेतली आहे. प्रमुख नेत्यांच्या क्षेत्रात कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा वाढल्याने नेत्यांनाही माघार घ्यावी लागत आहे.

जिल्हा परिषदेत संधी देण्याचा शब्द...

जळगावात आपल्याकडील स्पर्धा थोपविण्यासाठी तुल्यबळ उमेदवारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीत संधी देण्याचा शब्द नेत्यांनी दिल्याची चर्चा आहे. कारण बाजार समिती निवडणूक आटोपताच पुढे जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे काही कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यातही यश आल्याचे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com