Dhananjay Mahdik : खासदार महाडिकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेश पाटलांची साथ

भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीतील रंगत वाढली
Dhananjay Mahdik
Dhananjay MahdikAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा सोलापूर ः टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Co-operative Sugar Factory) संचालक मंडळ निवडणुकीमध्ये कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि भाजपचे खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahdik) यांच्या पॅनेलला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेस बारसकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

श्री. महाडीक यांनी निवडणुकीच्या आधीपासूनच निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन विरोधकांना केले होते. पण विरोधकांनी त्यांचे आवाहन धुडकावून भीमा बचाव पॅनेल या नावाने स्वतंत्र पॅनेल तयार केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील आणि भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे त्या पॅनेल चे नेतृत्व करत आहेत. महाडीक यांनीही भीमा शेतकरी विकास आघाडी या नावाने पॅनेल तयार केले आहे. प्रचाराचा प्रारंभही दोन्ही पॅनेलनी वडवळच्या नागनाथ मंदिरातून धूमधडाक्यात केला आहे. पण आता या निवडणुकीला वेगळे वळण मिळत आहे.

ऐन प्रचाराच्या धामधुमीत महाडीक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आणि रमेश बारसकर यांनी पाठिंबा दिला आहे. नुसता पाठिंबाच नव्हे, तर थेट प्रचाराच्या प्रारंभीच्या सभेत ते स्वतः उतरले. तसेच त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरुद्ध एका नेत्याने उघड भाजपच्या खासदाराला पाठिंबा देणे, यावरुन आता चर्चा सुरु झाल्या आहेत. पण स्वतः उमेश पाटील यांनी त्याला पक्षाचा रंग देऊ नका, सहकारात राजकारण नसते, असे उत्तर दिले आहे.  
माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना सोबत घेतले आहे. या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com