MPKV Clymex 2022 : राहुरीत ‘एमपीकेव्ही क्लायमेक्स’महोत्सव ः कुलगुरू डॉ. पाटील

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ‘नाहेप-कास्ट’ प्रकल्प व माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नातून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये २० ते २२ डिसेंबर दरम्यान ‘एमपीकेव्ही क्लायमेक्स-२०२२’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
MPKV
MPKVAgrowon

पुणे : ‘‘महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (MPKV) ‘नाहेप-कास्ट’ प्रकल्प व माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नातून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये २० ते २२ डिसेंबर दरम्यान ‘एमपीकेव्ही क्लायमेक्स-२०२२’ महोत्सवाचे (MPKV Clymex Festival 2022) आयोजन करण्यात आले आहे.

MPKV
MPKV, Rahuri : जगातील अग्रेसर कृषी विद्यापीठांशी फुले विद्यापीठाचा करार व्हावा

यातील प्रदर्शन सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांना विनामूल्य खुले राहील,’’ अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली. पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पाटील यांनी ही माहिती दिली. या वेळी पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘‘एमपीकेव्ही क्लायमेक्स २०२२’ महोत्सवात कृषी उद्योजकांचे व इतर उद्योजकांचे भव्य प्रदर्शन, कृषी पदवीधरांचा भव्य मेळावा, त्यांच्यासाठी रोजगार मेळावा, यशस्वी कृषी उद्योजकांची व्याख्याने, शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे व इतर उपक्रम होतील. तसेच माजी कृषी पदवीधरांचा भव्य मेळावाही होईल. या महोत्सवात यशस्वी कृषी पदवीधर, उद्योजक मार्गदर्शन करतील.’’

MPKV
MPKV Crop Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग)

‘‘आत्तापर्यंत रोजगार मेळाव्यासाठी १००० कृषी पदवीधरांनी व ३० कंपन्यांनी नोंदणी केली आहे. प्रदर्शनात कृषी पदवीधर उद्योजक, इतर उद्योजक, सरकारी, निमसरकारी, खासगी संस्था व शेतकरी उद्योजकांचे स्टॉल राहतील.

शेतीमधील विविध निविष्ठा, सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचा समावेश असेल. कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटिक्स तंत्रज्ञान, खासगी कंपन्यांकडून विकसित तंत्रज्ञान, विविध सरकारी, निमसरकारी संस्थेच्या योजना एकाच छताखाली पाहण्यास मिळतील.अधिक माहितीसाठी ‘एमपीकेव्ही क्लायमेक्स’च्या https://mpkv-climex2022.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. महोत्सवाचा शेतकरी, विद्यार्थी व इतर घटकांनी लाभ घ्यावा,’’ असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com