Mulayam Singh Yadav : मुलायमसिंह यादव यांचे निधन

उत्तरप्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री समाजवादी पक्षाचे (Socialist) संस्थापक मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले.
Mulayam Singh Yadav
Mulayam Singh YadavAgrowon

उत्तरप्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री समाजवादी पक्षाचे (Socialist) संस्थापक मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांना युरिन इन्फेक्शनमुळे (urine infection) श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मागच्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर आज त्यांचे निधन झाले.

आमदार ते मुख्यमंत्री अशी त्यांची 55 वर्षांची राजकीय कारकीर्द राहिली. त्यामध्ये त्यांनी 3 वेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवलं.

मुलायम सिंग यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1939 साली इटावा येथे झाला. राजकारणात त्यांचा प्रवेश अगदीच तरुण असताना केला. पुढे उत्तर भारतातील समाजवादी नेते अशी त्यांच्या ओळख झाली.

1996 ते 1998 दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते. 1992 साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 5 डिसेंबर 1989 रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

उत्तरप्रदेशाच्या राजकारणात मुलायम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी कायम प्रयत्न केले.

राष्ट्रीय राजकारणात एक धर्मनिरपेक्ष नेता अशी ओळख होती. त्यांचा पक्ष समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष मानला जातो. त्यांना प्रेमाने नेताजी म्हटले जाते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com