Mumbai - Mandva : मुंबई-मांडवा प्रवास ४० मिनिटांत

वॉटर टॅक्सीमुळे पर्यटन वाढीला हातभार
Mumbai - Mandva
Mumbai - MandvaAgrowon

अलिबाग : मुंबई ते मांडवा (Mumbai Mandva) दरम्यानचा सागरी प्रवास अधिक गतिमान झाला आहे. कारण भाऊचा धक्का येथून अवघ्या ४० मिनिटांत मांडवा बंदरात (Mandwa Bandar) पोहोचणे सहज शक्य झाले असून बेलापूर, जेएनपीटी, घारापुरीनंतर आता मांडव्यापर्यंतचा प्रवासही वॉटर टॅक्सीतून (Water taxi) करता येणार आहे.  

Mumbai - Mandva
Cotton Production: देशातील कापूस उत्पादकता कमी का ? | ॲग्रोवन

निसर्गरम्य वातावरणात व्यावसायिक भेटी, सेमिनार, प्रदर्शन, व्याखाने येथे होत असतात. परंतु नियोजित ठिकाणी कमी वेळेत पोहोचण्याची सुविधा नसल्याने येथील व्यवसायाला मर्यादा येत होत्या. त्यामुळे सध्या अस्थित्वात असलेल्या फेरी बोट, रो-रो सेवेपेक्षा अधिक गतिमान अशी वॉटर टॅक्सीची सुविधा मुंबईपासून मांडवापर्यंत सुरू करण्यात आली आहे. भाऊचा धक्का येथील डीसीटी-२ या जेट्टीवरून मंगळवारी (ता.१) ही सुविधा सुरू झाली असून, काही निवडक प्रवाशांना घेऊन ही बोट मांडवा बंदरात ११.५५ वाजता पोहोचली होती.

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज
नयन तारा शिपिंग कार्पोरेशनची या दुमजली टॅक्सीच्या तळमजल्यावर इकॉनॉमी क्लासमध्ये १३९ प्रवाशांना बसण्याची व्यवस्था आहे. तर दुसऱ्या मजल्यावर अपर क्लास टेकमध्ये ६० प्रवाशांना बसण्याची सुविधा आहे. पूर्णपणे वातानुकुलित असलेल्या या बोटीमध्ये आधुनिक रडार, संपर्क यंत्रणा यांसह खराब हवामानावेळी धोक्याचा इशारा देण्याची सुविधा असल्याची माहिती कॅप्टन वाजिद वावेकर यांनी दिली.


Mumbai - Mandva
Soybean Market: सोयाबीन विक्रीसाठी बाजारात रांगा

खूपच सुंदर, ही बोट खूप वेगवान तितकीच आरामदायी आहे. मात्र मांडवा बंदरात उतरल्यावर पुढील प्रवास करण्यासाठी या सेवेला जोडून प्रवासी सुविधा नाही. ही उणीव भरून काढल्यास ही टॅक्सी सेवा चांगली आहे.  
-अरविंद शहा, प्रवासी

दिवसाला वॉटर टॅक्सीच्या तीन फेऱ्या होणार आहेत. प्रवाशी चढण्यासाठी बंदरात पुरेशी जागा आणि तरंगती जेट्टी असल्याने प्रवाशांना फारशी अडचण येणार नाही.
- ए.एन. मानकर,
बंदर निरीक्षक, मांडवा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com