Mumbai APMC : मुंबई बाजार समिती सभापतींचा राजीनामा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती अनुक्रमे अशोक डक (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि धनंजय वाडकर (काँग्रेस) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Mumbai APMC
Mumbai APMCAgrowon

पुणे : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Mumabi APMC) सभापती आणि उपसभापती अनुक्रमे अशोक डक (Ashok Dakh) (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि धनंजय वाडकर (Dhananjay Wadkar) (काँग्रेस) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशातील या महत्त्वाच्या बाजार समितीवर वर्चस्वासाठी आता शिंदे गट सरसावला असून, सभापतिपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai APMC
APMC, Nashik : नाशिक बाजार समितीमधील भ्रष्टाचाराबाबत ‘ईडी’कडे पुरावे सादर

दरम्यान, महाविकास आघाडीतील सत्तावाटपामधील पहिली टर्म पूर्ण झाल्यामुळे राजीनामा देत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी शिंदे-फडणवीस सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांच्या भावाच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना गटाकडे बाजार समितीची सूत्रे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Mumbai APMC
APMC Election : शेतकऱ्यांना उमेदवारी देणारे विधेयक मंजूर

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील मोठ्या आर्थिक सत्ता केंद्राला धक्का लागणार आहे. मुंबई बाजार समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी सहा संचालकांच्या अपात्रतेचा स्थगिती दिली होती. विरोधकांनी ही स्थगिती नियमबाह्य असल्याचे म्हटले होते.

स्थगिती उठवलेल्या संचालकांत अपात्रतेला स्थगिती देण्यात आलेल्या संचालकांत माधवराव जाधव (बुलडाणा), धनंजय वाडकर (भोर, पुणे), बाळासाहेब सोळसकर (कोरेगाव, सातारा), वैजनाथ शिंदे (लातूर), प्रभू पाटील (उल्हासनगर ठाणे), जयदत्त होळकर (निफाड नाशिक), अद्वय हिरे (नाशिक) यांचा समावेश आहे.

यांतील माधवराव जाधव हे बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव यांचे बंधू आहेत. तर प्रभू पाटील हे देखील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. यामुळे जाधव की पाटील? याबाबत जोरदार चर्चा सुरू असून, सभापतिपदाकरिता त्यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सभापतिपदी कोणाची वर्णी लागते याबाबत उत्कंठा वाढली आहे.

सभापती पद हे अडीच वर्षांसाठी पक्षनेतृत्वाने दिले होते. माझा कालावधी संपल्यामुळे मी राजीनामा पणन संचालकांकडे पाठविला आहे.

- अशोक डक,

सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com