Organic Food : सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी महानगरपालिकेतर्फे मिळणार जागा

विषमुक्त शेतीमाल पिकवून पुणे शहरात स्वखर्चाने वाहतूक करून विक्री करण्यास इच्छुक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी यासाठी अर्ज सादर करावे.
Organic Produce
Organic ProduceAgrowon

पुणे : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत (SMART Project) पुणे जिल्ह्यात ‘अर्बन फूड सिस्टिम’ (Urban Food System) राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत ग्राहकांपर्यंत सेंद्रिय (Organic Produce) आणि विषमुक्त शेतमाल पोहोचविण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) जागा व ओटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Organic Produce
'अमूल' आता सेंद्रीय उत्पादने विकणार

शहरी बाजारपेठेत सेंद्रिय किंवा विषमुक्त शेतीमालाची मागणी जास्त आहे. शहरी बाजारपेठेच्या मागणीनुसार सेंद्रिय किंवा विषमुक्त शेतीमाल पुरवठा करावयाचा आहे. असा शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अर्बन फूड सिस्टिम’अंतर्गत आत्मा, कृषी विभाग, पणन विभाग व पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत शेतकरी आठवडे बाजार, सुनियोजित किरकोळ बाजार, मिड डे मिल या संकल्पनेतील शाळांचे किचन व ओटा मार्केटच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत जागा व ओटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विषमुक्त शेतीमाल पिकवून पुणे शहरात स्वखर्चाने वाहतूक करून विक्री करण्यास इच्छुक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी यासाठी अर्ज सादर करावे.

माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधा

इच्छुकांनी अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना आदी माहितीकरिता प्रकल्प संचालक, आत्मा पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी अर्जामध्ये नमूद माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज पुणे जिल्हा प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालयात २० जुलै २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे स्मार्ट प्रकल्पाच्या जिल्हा अंमलबजावणी प्रमुखांनी कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com