Election : राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्थगित

राज्यातील महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांची सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. (State Election Commission)
State Election Commission
State Election CommissionAgrowon

राज्यातील महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांची सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया (Election Process) थांबवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) दिले आहेत. आज 5 ऑगस्ट रोजी या सर्व जिल्हा आणि महापालिकेच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र ही प्रकिया स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

अलीकडेच एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde) मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला. या बैठकीत 3 ऐवजी पुन्हा 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच जिल्हा परिषदांमधीलही (Zila Parishad) वाढीव गट आणि गणाची संख्याही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी (4 ऑगस्ट) रोजी त्यासंदर्भातील अध्यादेशही राज्य सरकारने काढला होता. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याचा अध्यादेश जारी केला.

या अध्यादेशानुसार पुढील जिल्हा परिषदाच्या निवडणुक स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकृत ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.

25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज (5 ऑगस्ट) रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती.

त्याचबरोबर 13 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी 8 ऑगस्ट 2022 रोजी आणि 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता सगळी प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत 'जैसे थे' राहणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com