Murud Beach : मुरूड किनारा उधाणामुळे उजाड

मुरूड समुद्रकिनारी वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते, मात्र उधाणामुळे येथील किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे.
Tourists
Tourists Agrowon

मुरूड ः मुरूड समुद्रकिनारी (Murud Beach) वर्षभर पर्यटकांची (Tourists) वर्दळ असते, मात्र उधाणामुळे येथील किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. सुरूची झाडे उन्मळून पडल्‍याने वने उजाड झाल्‍याने पर्यटकांसह स्‍थानिकांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे. लाटांच्या माऱ्यामुळे नगर परिषदेने लावलेले दिवे, तसेच बसण्यासाठी बांधलेले सिमेंटच्या कट्ट्यांचीही मोडतोड झाली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी किनारपट्टीचे लवकरात लवकर सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्‍थानिक व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

कृषी योजनेंतर्गत १९८० मध्ये सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र भरतीचे पाणी घुसल्‍याने वनाची बांधबंदिस्‍ती नष्‍ट झाल्‍याने सुरूची झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार वाढले आहेत.

कोविडमुळे दोन वर्षे परिसरातील व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. आता कुठे पर्यटनाचा हंगाम बहरू लागला आहे. मात्र किनारी भागात कचऱ्याचे ढीग, बाकड्यांची दुरवस्‍था पाहून पर्यटकांचा हिरमोड होतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी किनारपट्टीचे सुशोभीकरण व सुरूच्या वनांचे संवर्धन होणे गरजेचे असल्‍याचे स्‍थानिकांकडून बोलले जात आहे.

सुरूच्या झाडांचे संवर्धन आवश्‍यक

मुरूडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्‍यामुळे स्‍थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्‍ध होत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी किनारा सुशोभीकरण व सुरूच्या झाडांचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. मेरिटाईम बोर्डाचा यासाठी सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे, तरच व्यवसायात वृद्धी येईल, असे मत स्‍थानिक व्यावसायिकांकडून व्यक्‍त करण्यात आले.

Tourists
Farmer Incentive Scheme : पन्नास हजार शेतकरी‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत

समुद्र किनारा सुशोभीकरणाच्या दोन प्रस्तावांना निधी प्राप्त झाला आहे. पहिला प्रस्ताव विश्रामबाग ते तवसाळकर वाडीदरम्यान वाहनतळ व सुशोभीकरणासाठी ११ कोटी ४० लाख, तर दुसरा प्रस्ताव बोट क्लब ते एमटीडीसीपर्यंतच्या भागात नष्ट झालेली सुरूची वने पूर्ववत करण्यासाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दोन्ही प्रस्तावांना सीआरझेडकडून परवानगी मिळताच संपूर्ण किनाऱ्याचे सौंदर्यीकरण करण्यात येईल.

- पंकज भुसे, मुख्याधिकारी, मुरूड

मुरूड हे निसर्गतः सुंदर व स्वच्छ शहर असल्याने पर्यटकांना नेहमीच भुरळ पडते. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन रस्‍ते सुस्‍थितीत करणे, किनाऱ्याचे सौंदर्यीकरण होणे गरजेचे आहे.

- विद्याधर आकुलकर, पर्यटक, बिलासपूर-छत्तीसगड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com