वास्तू संग्रहालय सामाजिक न्यायाची स्फूर्ती देईलः पाटील

महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पालकमंत्री पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुण आदरांजली वाहिली.
Chatrapati Shahu Maharaj
Chatrapati Shahu MaharajAgrowon

कोल्हापूर : ‘‘लक्ष्मी विलास पॅलेस हे राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले वास्तू संग्रहालय लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. या संग्रहालयास भेट देणारी प्रत्येक व्यक्ती राजर्षी शाहू महाराजांच्या (Chatrapati Shahu Maharaj) सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल,’’ असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Chatrapati Shahu Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त त्यांना रविवारी (ता.२६) शहरासह जिल्ह्यात अभिवादन करण्यात आले. महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पालकमंत्री पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुण आदरांजली वाहिली. या वेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व इंद्रजित सावंत उपस्थित होते.

जिल्हा समाजकल्याण कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथामध्ये पारंपरिक वेषभूषा परिधान करून जिवंत देखावा सादर करण्यात आला. शाहू स्मारक येथे सांस्कृतिक कार्य विभाग, पुराभिलेख संचालनालय व कोल्हापूर पुरालेखगार कार्यालयातर्फे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जीवनपटावर आधारित दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

समता दिंडी ठरली आकर्षण

जयंतीनिमित्त दसरा चौकात आयोजित करण्यात आलेल्या समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समता दिंडीचे उद्घाटन श्री शाहू महाराज छत्रपती व पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. समता दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ, झांज, ढोल ताशा, लेझीम आदी कलाप्रकार सादर केले. या वेळी शाहू महाराजांच्या (Chatrapati Shahu Maharaj) वेशभूषेतील मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com