
मुंबई ः ‘‘विधान परिषदेच्या (MLC Election) पाच जागांसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदार (Nashik Graduate Constitution) संघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) व नागपूर शिक्षक मतदार संघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे.
नाशिक मतदार संघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले आहे. सत्यजित तांबे यांच्यावरही कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले, ‘‘विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत समन्वय आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाशी बेइमानी केली.
त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला व नागपूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना ‘मविआ’चा पाठिंबा आहे. `मविआ`चे उमेदवार नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लींगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील व कोकणमधून बाळाराम पाटील असतील.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.