‘माझी झेडपी माझा अधिकार’ प्रणाली सुरू

जिल्हा परिषदेचा पारदर्शक कामासाठी पुढाकार
‘माझी झेडपी माझा अधिकार’ प्रणाली सुरू

पुणे ः जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांविषयी (Development work) नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘माझी झेडपी माझा अधिकार’ (My Zp My Right) ही नागरिक अभिप्राय प्रणाली तयार केली. या प्रणालीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते नुकताच प्रारंभ करण्यात आला. आता ही प्रणाली प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे नागरिक जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचे गुणांकन करून सामाजिक मूल्यमापन करणार आहे.

या प्रणालीद्वारे सामान्य नागरिकांना विविध योजनांबाबत प्रतिक्रिया, सूचना देता येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या punezp.mkcl.org या संकेतस्थळावर ‘विशेष मोहीम’ शीर्षकाखाली ‘जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी महालाभार्थी’ पर्यायावर क्लिक करायचे आहे. जिल्हा परिषद महालाभार्थीमध्ये आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करावी लागेल. नोंदणी केलेल्या नागरिकांनाच या प्रणालीचा उपयोग करता येईल. नोंदणी केल्यानंतर ‘माझी झेडपी माझा अधिकार’ या पर्यायावर क्लिक करून या प्रणालीचा वापर करता येईल.

या प्रणालीद्वारे नागरिकांना आपला तालुका व गाव निवडता येईल. त्यानंतर त्या गावातील कामांची यादी आपल्या समोर येईल. एखाद्या कामाविषयी प्रतिक्रिया देऊन छायाचित्रही अपलोड करता येईल. या कामाला गुणांकनही देता येईल. त्यानुसार विविध योजनांचे सामाजिक मूल्यांकन करता येईल. यामुळे विविध योजनांच्या सुधारणेला वाव आहे, हे कळू शकेल. पारदर्शक आणि प्रगतिशील प्रशासनात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. हा सहभाग घेऊन जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामांचा दर्जा चांगला राहावा आणि त्याबाबत त्यांचीच मते विचारात घेतली जावी, या दृष्टीने तयार करण्यात आलेली ही प्रणाली उपयुक्त ठरेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com