'एनएएआरएम'ला सरदार पटेल पुरस्कार

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याहस्ते एनएएआरएमचे (NAARM) संचालक श्रीनिवास राव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
NAARM
NAARMAgrowon

नॅशनल अॅकेडमी ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च मॅनेजमेंटला (NAARM- एनएएआरएम) २०२१ चा सरदार पटेल आउटस्टँडिंग आयसीएआर (ICAR-इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च) इन्स्टिट्यूट पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या एकूण योगदानाची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते शनिवारी (१६ जुलै) एनएएआरएमचे (NAARM) संचालक श्रीनिवास राव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

NAARM
कृषी विद्यापीठांचा उपयोग काय?: नितीन गडकरी यांचा सवाल

आयसीएआरच्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. एनएएआरएम (NAARM) ही आयसीएआर (ICAR) अंतर्गत काम करणारी संशोधन संस्था आहे. कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्ताराच्या हेतूने आयसीएआरकडून १९७६ साली हैद्राबाद येथे एनएएआरएम (NAARM) या संस्थेची स्थापना करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com